28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeराजकीयसुजय विखेंनी निलेश लंकेंना लगावला खोचक टोला

सुजय विखेंनी निलेश लंकेंना लगावला खोचक टोला

टीम लय भारी

अहमदनगर  :- आज नगर जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींची झडत सुरू झाली आहे. भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या झडत दिसून आली आहे. आम्हालाही लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले, मात्र आम्ही ते कुणाला दाखवत बसलो नाही, असा खोचक टोला सुजय विखे यांनी निलेश लंकेंना लगावला आहे (Nilesh Lanka has been hit hard by Sujay Vikhe).

कोरोना संकटाच्या काळात आमदार लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरची चर्चा जागतिक पातळीवर झाली. त्यामुळेच त्यांचा लंडन बूक ऑफ रेकॉर्डने सन्मानही करण्यात आला आहे. त्यावर बोलताना आम्हालाही लंडन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळाले, मात्र आम्ही ते कुणाला दाखवत बसलो नाही. असा टोला सुजय विखे यांनी निलेश लंकेंना लगावला आहे.

पुंडलिक विठ्ठलाला वीट फेकून का मारतो? हे माहिती आहे का?

अनेकांचे प्राण वाचविणाऱ्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

कोरोना नियंत्रणासाठी आमदार किंवा खासदार काय करु शकतो? तर प्रत्येक शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचाऱ्याने त्यांचे काम चोख बजावल्यामुळे नगरची लोक आज जिवंत आहेत. हे काही फक्त एका माणसामुळे किंवा आमदार,  खासदारामुळे नाही, अशी टीका सुजय विखे यांनी लंके यांच्यावर केली आहे. तसेच आम्ही कधीही आपण देव आहोत असे म्हणालो नाही, असेही सुजय विखे म्हणाले आहेत.

Nilesh Lanka has been hit hard by Sujay Vikhe
निलेश लंके आणि सुजय विखे पाटील

सुजय विखेंना निलेश लंकेंचा टोला

यानंतर निलेश लंके यांनीही सुजय विखे पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोरोना संकटाच्या काळात 185 कोटींचा फायदा केला, तर 17 हजार लोक वाचवली हे बोलायला सोपे असते. त्यांनी रेमडेसिव्हीर विमानातून आणले पण कुठे वाटले ते दाखवा, असे आव्हान लंके यांनी दिले आहे. आधी तालुक्यातील लोकांना भीती वाटत होती आता जिल्ह्यातील लोकांना भीती वाटत आहे. असा टोलाही त्यांनी सुजय विखे यांना लगावला आहे. त्यांच्या विखे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही आपण नीट केले आहे. वेळ आली तर आम्ही जिल्ह्यातही सक्षम आहोत,  असा थेट इशारा लंके यांनी सुजय विखेंना दिला आहे (Lanka has given such a direct warning to Sujay Vikhen).

नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Did not procure, only transported Remdesivir, says MP Sujay Vikhe Patil

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीकडून निलेश लंकेंना ताकद?

लंकेंच्या या इशाऱ्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत तर दिले नाहीत ना? अशी चर्चा आता नगर जिल्ह्यात सुरु झाली आहे. निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाचे कौतुक केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निलेश लंके यांना अहमदनगर जिल्ह्यात बळ दिले जाण्याची शक्यता लंकेंच्या वक्तव्यानंतर व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी