टीम लय भारी
मुंबई : शाहरुख खानच्या मुलाला चरस घेतल्याप्रकरणी NCB ने अटक केली आहे. यावर अनेक राजकीय नेते आपली मतं मांडत आहेत. वाहत्या गंगेत हात धुवावेत तसे शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आपली प्रतिक्रिया याविषयी नोंदवली आहे. (Nilesh Rane’s baseless allegations against Aditya Thackeray)
संजय राऊतांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकरांचा गृहमंत्र्यांवर निशाणा
संज्याने अमली पदार्थांच्या विषयावर बोलण्या अगोदर प्रमुखाच्या कुटुंबात कोणी अमली पदार्थांच्या आहारी तर गेला नाही ना याची खात्री करून घ्यावी. नशिबाने प्रमुखाचा पोर त्या बोटीवर न्हवता नाही तर बॉलिवूडची पार्टी असली की हा फुकट्या तिथे असणारच.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 5, 2021
शरद पवारांनी मोदी – योगी सरकारवर ओढला आसूड
इतरांच्या मुलांविषयी तसेच अमली पदार्थांविषयी बोलताना आपल्या पक्षप्रमुखांच्या घरात डोकावून पहा. नशिबाने त्यांचा मुलगा त्या पार्टी मध्ये नव्हता असे राणे आपल्या ट्विट मधून म्हणाले.
राणे पुढे असेही म्हणाले की बॉलिवूडची पार्टी असती तर फुकट्या त्याठिकाणी दिसलाच असता. आदित्य ठाकरेंना राणेंनी फुकट्या असे संबोधून त्यांचा घोर अपमान केला आहे.
तसेच राणेंनी ठाकरेंवर केलेल्या आरोपांना कोणत्याही प्रकारचे आधार नाहीत. यावर पुन्हा सेना राणे याना के प्रतिउत्तर देते यावर आता सर्वांचे डोळे लागले आहेत.
आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कस्टडी
pune police issued notice against rane family