35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयहिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग बघू नितेश...

हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग बघू नितेश राणेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान

टीम लय भारी

मुंबई: पिंपरी चिंचवडमध्ये माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. रविवारी विकासकामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आल्यानंतर राज्यातील परिस्थिती थोडी तापली आहे. आणि त्यादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी आमने-सामने आले होते. आणि यावेळची ती परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जदेखील केला.( Nitesh Rane’s challenge to NCP)

आणि यावर संताप व्यक्त करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया नोंदवली असून, राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर आव्हानच दिलं की, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इतकी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते महाराष्ट्रात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलाचा हार घालण्याचा कार्यक्रमात हाती घेऊ.

आमच्या नेत्यांना अशा पद्धतीने विरोध करत असतील तर भाजपाचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. हिंमत असेल तर पोलिसांना २४ तासांसाठी सुट्टीवर पाठवा, मग चप्पल कुठे कुठे घालायला लावतो पाहा,” असं जाहीर आव्हानही नितेश राणेंनी यावेळी दिलं.

हे सुद्धा वाचा

‘तारीख पे तारीख’ देत नितेश राणेंचा कोठडीतला मुक्काम वाढला!

नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, पोलीस आणि राणेंमध्ये शाब्दिक चकमक

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Mumbai: Narayan Rane, son Nitesh interrogated for 9 hours in Disha Salian case

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी