25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अधिकाऱ्याने केली 100 किमी सपत्निक पदयात्रा

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अधिकाऱ्याने केली 100 किमी सपत्निक पदयात्रा

लय भारी न्यूज नेटवर्क

दिंद्रुड : मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्रात जोरदार राजकीय रस्सीखेच चालू आहे. मात्र मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा यावेत यासाठी एका अधिकाऱ्याने संत शिरोमणी मन्मथस्वामी यांच्या समाधीवर महाभिषेक करून साकडे घातले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांनी 100 किलो मीटर सपत्निक पदयात्रा सुद्धा केली. ओमप्रकाश शेटे असे या अधिकाऱ्यांचे नाव आहे. मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे ते विशेष कार्य अधिकारी म्हणून पाच वर्षे काम करीत होते.

शेटे यांच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने राज्यातील अनेक गोरगरीबांना वैद्यकीय लाभ मिळवून दिला. त्यामुळे शेटे यांचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठा चाहता वर्ग आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच शेटे यांना या पदाची संधी दिली होती. या पदाच्या माध्यमातून शेटे यांनी अनेकांचे कल्याण केले. गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा व उपचाराअभावी कोणत्याही परिस्थितीत रुग्ण दगावता कामा नये अशी फडणवीस यांची आग्रही भूमिका होती. शेटे यांनी ही भूमिका यशस्वीपणे बजावली.

देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी अधिकाऱ्याने केली 100 किमी सपत्निक पदयात्रा

राज्याचा व्याप सांभाळताना अत्यंत व्यस्त असतांनाही सामान्य नागरिकांच्या साध्या मेसेजची दखल घेऊन मुख्यमंत्री उत्तरे द्यायचे. खास करून गरीब व गरजू रुग्णांना ताबडतोब उपचार मिळावेत यासाठी रात्री – अपरात्री सहाय्यता कक्षाला मुख्यमंत्री सूचना द्यायचे. वेगवेगळ्या आजारासाठी गेल्या पाच वर्षांत एकवीस लाख रुग्णांना पंधराशे कोटी रुपयांची मदत देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत, अशी भावना शेटे यांनी व्यक्त केली आहे.

सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून अहोरात्र राज्याच्या प्रगतीसाठी धडपडणारे देवेंद्र फडणवीस हे परत मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभावेत यासाठी ओमप्रकाश शेटे यांनी दिंद्रुड ते कपिलधार अशी पदयात्रा पूर्ण केली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौ. शिल्पाताई या सुद्धा होत्या.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंनी रूग्णालयात जाऊन लता मंगेशकरांच्या तब्येतीची केली चौकशी

आमदार रोहित पवारांनी अधिकाऱ्यांसोबत घेतली दहा तासांची बैठक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी