29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयपंकजा मुंडे पुन्हा कडाडल्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच गरजल्या

पंकजा मुंडे पुन्हा कडाडल्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोरच गरजल्या

टीम लय भारी

मुंबई :- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर काल भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षांनी आंदोलन केले. त्यानंतर आज लोणावळ्यात ओबीसी राजकीय आरक्षण चिंतनमंथन शिबीर पार पडले. त्यातही सर्व पक्षाते ओबीसीचे नेते एकत्र आलेले आहेत. आजच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंत्री वडेट्टीवार,भाजपा नेत्या पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते (OBC will not allow upcoming elections without reservation Pankaja Munde). 

तीन-चार महिन्याच्या आत इम्पिरिकल डाटा तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ द्यायच्या नाहीत.” असे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. लोणावळ्यात आज ओबीसी नेत्यांचे चिंतनमंथन शिबीर पार पडले यामध्ये बोलताना पंकजा भूमिका मांडली (Pankaja played a role in the OBC leaders’ brainstorming camp held in Lonavala today).

नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार

भाजपच्या आंदोलनाला काँग्रेसची टक्कर

पंकजा मुंडे म्हणाल्या, “आधी मराठा समाजाचे शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण रद्द, तर आता ओबीसी राजकीय आरक्षण रद्द किती घोर अन्याय आहे दोन्ही वर!! माध्यमाची आणि लोक प्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची वितुष्ट येईल असे होऊ देऊ नका हात जोडून विनंती आहे.”

Pankaja Munde not allow elections OBC reservation
पंकजा मुंडे

तसेच, “हे शिबीर निर्णय आणि निश्चयाचे आहे. तीन-चार महिन्याच्या आत इम्पिरिकल डाटा तयार करून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा. ओबीसींच्या आरक्षणाला संरक्षण दिल्याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ न देण्यासाठी सरकारने न्यायालयात जावे.” असे देखील पंकजा मुंडेंनी यावेळी बोलून दाखवले (The government should go to court to prevent the upcoming local body elections without protecting the reservation of OBCs. ” This is also what Pankaja Munde said this time).

‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’

Chhagan Bhujbal raises eyebrows as he urges Fadnavis to lead OBC community, ensure political reservation

तर, “ओबीसींना आरक्षण परत मिळाल्याशिवाय राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; आतापर्यंत अनेक निवडणुका पुढे ढकलल्या तशा ह्या देखील ढकलाव्यात” ओबीसींच्या हक्कासाठी राजधानीत चक्काजाम करू, न्यायालयात जाऊ…” चक्का जाम तो झाकी है, असली आंदोलन अभी बाकी है” असे काल पंकजा मुंडे यांनी ट्विट केले होते. “मराठा ओबीसींत वाद राजकारण करू नका हे महापाप आहे. भिंत उभी करू नका.

सामाजिक मागासलेपण दुर करण्यासाठी आरक्षण शाहू महाराज, आंबेडकरांनी दिलय. हा सामाजिक परिवर्तनाचा लढा, नेतृत्व माझे नाही तुमचं आहे, ही लढाई आपल्याला सर्वांनी मिळून जिंकायची आहे. आम्ही न्याय दिला होता पण सरकार बदलले. सरकारने वेळ घालवला. डाटा तयार केला नाही. इम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम सरकारचे त्यांनी ते करावे.” असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटलेले आहे (It’s up to the government to create the imperial data. ” This is also stated by Pankaja Munde).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी