31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबईपोलीस पुत्रांच्या हक्काच्या घरासाठी मनसेचा पाठिंबा

पोलीस पुत्रांच्या हक्काच्या घरासाठी मनसेचा पाठिंबा

टीम लय भारी

मुंबई :- वरळी मधील बीडीडी चाळीतील पोलीसांची हक्काची घरे त्यांच्या नावांवर होत नाहीत तोपर्यंत हक्कांच्या घरांसाठी सुरू असलेला पोलीस परिवाराचा लढा सुरूच राहिल, असा निर्धार आज सर्वांनी घेतला (The ongoing police family fight for rights homes will continue).

एवढेच नव्हे तर गेले अनेक वर्ष पोलीसांच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा ताटकळत पडलेला प्रश्न मार्गी लागत नाही पर्यंत मतदान करणार नसल्याचीही भूमिका पोलीस परिवाराने घेतली आहे. पोलीस पुत्रांच्या हक्काच्या घरासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला लेखी पाठिंबा जाहीर करीत या लढ्याला बळ दिले आहे (Maharashtra Navnirman Sena has given its written support for the rightful home of police sons).

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या योजनेला जयंत पाटलांनी ठरवले बोगस

धनंजय मुंडेंच्या कामाचा झपाटा, मध्यरात्रीही जनतेचे सोडविले प्रश्न

उत्तर प्रदेश, बिहारमधील परप्रांतियच नव्हे तर बांगलादेशीसुद्धा मुंबईत येऊन झोपड्या बांधतात आणि त्यांच्याही झोपड्या नावावर होतात, मग पोलीसांच्या नावावर घरे का होत नाहीत? असा प्रश्न पोलीसांच्या परिवाराला पडला आहे. पोलीस मुंबईच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावतात तरी सुध्दा हक्कांच्या घरासाठी लढा करावा लागत आहे (Even though the police are risking their lives to protect Mumbai, they have to fight for their rightful home).

बीडीचाळीतील पोलीसाना हक्कांची घरे मिळून देण्यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आजवर केवळ आश्वासने दिली आहेत. परंतु पोलीसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूमी मार्गी लागावा म्हणून पोलीस परिवारानी पुढाकार घेऊन “घरं नाही तर, मतं नाही” ही नवी चळवळ सुरू करून पावले उचलली आहे. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत आज सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.

MNS written support for the rightful home of police sons
पोलीस पुत्रांची लढाई

पोलीसांच्या हक्काच्या घरासाठी सुरू असलेला लढा यापुढेही सुरूच राहणार. पोलीस कुटुंबांच्या जोरावर अनेक राजकीय पक्ष मोठे झाले. अनेकांनी आपापल्या पोळ्या भाजल्या. पण आता एकाही राजकीय पक्षाला पोलीस परिवार मतांची भीक घालणार नाही. पुरे झालीत तुमची तोंडी आश्वासनं! आता हवाय लेखी पाठिंबा, असेही पोलीस परिवारातल्या तरूणांनी राजकीय पक्षांना ठणकावून सांगितले (Enough with your verbal assurance! Now there is written support in Hawaii, said the youth from the police family to the political parties).

एक तृतीयपंथी झाली झाल्टे घराण्याची सूनबाई…

“Duty Over Entitlement”: Himachal Police Chief After Cops Fight In Public

पोलीस पुत्रांच्या या भावना कळताच मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी पोलीस परिवाराची भेट घेऊन त्यांना मनसेचा लेखी पाठिंबा जाहीर केला. मनसे प्रमुख राज ठाकरे नेहमीच पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेत. आझाद मैदान दंगलीच्या प्रसंगी पोलीसांवर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढणारा मनसे हा एकमेव राजकीय पक्ष होता. त्यामुळे पोलीसांच्या घराच्या लढ्यातही मनसे उतरणार असल्याचेही संतोष धुरी यांनी आश्वासन दिले (Santosh Dhuri also assured that MNS will also get involved in the fight at the house of the police).

पोलीस परिवाराच्या आजच्या बैठकीमुळे स्थानिक पातळीवरील राजकरण चांगलेच तापलेय. सर्व पोलीस परिवार एकत्र आले तर काहीही करू शकते. हेच राज्य सरकारला दाखवून देण्याची वेळ आता जवळ आली आहे. आपण आजवर अनेक पक्षांचे झेंडे हाती घेतलेत. पण आता कुणाचाच झेंडा हाती नको. जो आपल्यासाठी लढणार तोच आपला. आताची लढाई ही पोलीस पुत्रांची लढाई आहे.

MNS written support for the rightful home of police sons
पोलीस परिवाराची लढाई

पोलीस परिवाराची लढाई आहे. ही लढाई पोलीस परिवारच जिंकणार. कारण आता ही लढाई  कोणत्याही राजकीय पक्षाची नाही तर पोलीस कुटुंबाची आहे. जोपर्यंत ही घरे नावावर होत नाहीत तोर्पंत ही लढाई अशीच सुरू राहणार. आता मनसेने लेखी पाठिंबा दिला आहे. उद्या परवा शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसही आपला लेखी पाठिंबा जाहीर करतील असा विश्वास आहे. पण आम्ही एवढ्यावरच थांबणार नाही आहोत. आता पोलीस परिवारातील प्रत्येक घराघरातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीली जातील, असेही पोलीस परिवारातील सदस्यांनी सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी