28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीय...अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले

…अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले

टीम लय भारी

नाशिक :  संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपण सहभागी झालो होतो. बेळगावमध्ये कर्नाटक पोलिसांनी मला व एस. एम. जोशी यांना अटक केली होती. एवढेच नव्हे तर, पाठीवर वळ उठेपर्यंत पोलिसांनी आम्हाला मारहाण केली होती, अशी जुनी आठवण शरद पवार यांनी काढली. कर्नाटक सरकारचे छगन भुजबळांवर अधिक प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी भुजबळांना दोन महिने तुरूंगात ठेवल्याचेही पवार यांनी सांगितले.

नाशिक येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी आणखी एक जुनी आठवण सांगितली. मी बऱ्याच वर्षांपूर्वी राज्यमंत्री होतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू होता. या प्रचारावेळी हाजी मस्तान माझ्या शेजारी बसला होता अशा बातम्या त्यावेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. पण हाजी मस्तान कोण आहे हे मला माहितच नसल्याचे ते म्हणाले.

...अन् शरद पवारांना पोलिसांनी पाठीवर वळ उठेपर्यंत मारले
जाहिरात

खासदार संजय राऊत यांनी इंदिरा गांधींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या संदर्भाने शरद पवारांनी हाजी मस्तानचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, सार्वजनिक जीवनात अनेक लोक भेटतात. पण त्या सगळ्यांचीच माहिती असते असे नाही. संजय राऊत यांनी उदयनराजेंविषयी केलेल्या वक्तव्यांविषयी मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी इंदिराजींविषयी असे विधान टाळायला हवे होते. इंदिरा गांधींविषयी संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. थोरात व चव्हाण काहीही गैर वागलेले नाहीत. नेतृत्वाविषयीच्या असलेल्या भावनांमुळे ते असे बोलले आहेत. आम्ही मूळचे काँग्रेसचे आहोत. काँग्रेसवाले व्यवहारी असतात. त्यामुळे या वक्तव्यांचा सरकारवर काहीही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी