30 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयPolitics : पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने : चंद्रकांत पाटील

Politics : पार्थ पवारांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आणि शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते (Politics) आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने सुरू आहे, (Parth Pawar’s journey towards ‘Satyamev Jayate’ says Chandrakant Patil) असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पार्थ पवार यांनी सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरण आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत राजकारण आणि पक्षनिष्ठा अशी राजकीय मते व्यक्त न करता स्वत:ची ठोस भूमिका बेडरपणे व्यक्त केली आहे. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे भाजपला ठाकरे सरकारवर निशाणा साधण्याची संधी मिळाली.

बीडमधील विवेक रहाडे या युवकाने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केली. त्यावर उद्विग्न होऊन पार्थ पवार यांनी ट्विट केले आहे. मराठा नेत्यांनी वेळीच जागे होऊन आरक्षण मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. राज्य सरकारने हा गुंता सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलली पाहिजेत, अशी मागणी पार्थ यांनी केली आहे. विवेक यांनी आमच्या मनात पेटवलेली ज्योत व्यवस्थेला पेटवेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्याबाबत विचारणा केली असता पाटील यांनी पार्थ पवार हे ‘सत्यमेव जयते’च्या मार्गावर असल्याचे मत व्यक्त केले. पार्थ पवार यांनी यापूर्वीही सुशांतसिंह रजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याची मागणी केली होती. त्यामुळे ते आतल्या आवाजाला अधिक महत्त्व देतात, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

पुण्यात खासदार गिरीश बापट व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाला गुरुवारी सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, पार्थ पवार यांची सत्यमेव जयतेकडे वाटचाल सुरू आहे. पण याचवेळी पार्थ यांच्या भाजप प्रवेशावर असा कुठलाही प्रस्ताव अजूनतरी आलेला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच मराठा आरक्षणाचा अध्यादेश केंद्राला काढता येणे कदापि शक्य नाही. आरक्षण हा राज्याचा विषय आहे. ही बाब इतकी वर्ष राजकारणात सक्रिय असणा-या शरद पवारांना माहिती नाही का? असा सवाल उपस्थित करत पाटील यांनी पवारांवर टीकास्त्र सोडले. तर दुसरीकडे भाजप प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी देखील पार्थ यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. तसेच पार्थ यांच्या मागणीची राज्य सरकार यावेळी तरी गंभीर दखल घेणार की पुन्हा कवडीची किंमत देणार? असा खोचक प्रश्न विचारत महाविकास आघाडीवर टीका केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी