35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयडाव फिस्कटला; वंचितांनी घेतली जरांगेंची साथ; जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला दिली उमेदवारी

डाव फिस्कटला; वंचितांनी घेतली जरांगेंची साथ; जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला दिली उमेदवारी

लोकसभाच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला धक्का देत पहिली यादी जाहीर केली. तसेच, आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा झाली असल्याचे सांगत आम्ही ओबीसी, जैन, मुस्लीम उमेदवार देणार आहोत. गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाईल अशी घोषणा केली आहे. (Prakash Ambedkar Announce First List Of Candidate For Lok Sabha Election)

उमेदवारांची घोषणा करताना प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांचा उल्लेख केला. काल जरांगे पाटील यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. त्यांच्या चर्चेनंतर जैन-मुस्लिम- ओबीसी समाजाला उमेदवारी दिली जाईल असा निर्णय घेण्यात असल्याचे आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं.

तसेच, आम्ही जरांगे पाटील यांच्याशी आघाडीबाबत सविस्तर चर्चा केली आहे. येत्या काळात याबाबत निर्णय घेण्यात येईल. घराणेशाही सोडून गरीब उमेदवारांना तिकीट दिले जाणार आहे. जैन उमेदवाराला तिकीट दिले जाईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आपली असेल, असही आंबेडकर यावेळी म्हणाले.

गेल्या काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्येच असतील असे वारंवार मविआमधील पक्ष सांगत होते. पण थेट कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. दरम्यान, आज प्रकाश आंबेडकर यांनी ‘एकला चलो रे’ चा नारा देत आपल्या उमेदवारांची घोषणा केली. वेगळी वाट धरण्याचा निर्णय कालच आंबेडकर यांनी अप्रत्यक्षपण सांगितला होता.

काल दिला होता ‘एकला चलो रे’ चा नारा

माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र,आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही,” असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी