29 C
Mumbai
Monday, September 4, 2023
घरराजकीयमोहन भागवतांना सुद्धा जेल मध्ये टाकू : प्रकाश आंबेडकर

मोहन भागवतांना सुद्धा जेल मध्ये टाकू : प्रकाश आंबेडकर

तुम्ही मला सत्ता द्या मोहन भगवतला सुद्धा जेल मध्ये टाकू. तुम्हाला शस्त्र बाळगण्याचा अधिकार कोणी दिला. एके 47, शस्त्र त्यांच्या पुजेमध्ये दिसतात. हे हत्यार आरएसएस कडे आले कोठून असा सवाल करत, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर हत्याराचे मार्केट आहे. तिथूनच हे शस्त्र आणतात. मणिपूरची परिस्थीती ही देशामध्ये सुद्धा होऊ शकते असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.

वाढत्या जातीयता आणि धर्मांधतेतून सुरू असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राहुरी येथे बहुजन अल्पसंख्यांक जनआक्रोश महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगली घडविल्या जातील, समाजात फुट आणखी कशी वाढेल हे पहिल्या जाईल, त्यामुळे आताच निर्णय घ्या, आपलं मत आजच ठरवा आणि भाजप – आरएसएसची सत्ता उलथवून टाका असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, चीन ने भारतीय सीमा वादावर गलवान घाटी आणि लद्दख भागात चीन 20 किलोमिटर भारताच्या हद्दीत आला आहे. टेंट टाकलेत, आर्मी लावली आहे, हे खरंय की खोट आहे हे  सरकारने सांगावे असा प्रश्न यावेळी त्यांनी विचारला. माझ्यावर विश्वास नाक ठेऊ पान भाजप खासदार आणि माजी परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम स्वामी म्हणताहेत की 12 किलोमीटर हद्द चिनकडे गेली आहे.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध
जालन्यातील घटनेचे राज्यभर पडसाद! पहा कुठे काय झालं?

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, निवडणूक कधीही लागू शकते. 2 हजाराच्या नोट बंद केल्या तेव्हाच मी म्हणालो होतो निवडणूक लवकर लागू शकतात. कारण विरोधी पक्षांची आर्थिक कोंडी करून, तयारीला वेळ न देता निवडणुका लावण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे प्रचार करायला वेळ मिळेल न मिळेल पण तुम्ही आताच निर्धार करा की माझं मत हे भाजप विरोधातच राहणार!

प्रकाश आंबेडकर म्हणाले, जे हारेगावला केल ते एक भीतीच वातावरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला लवकरात लवकर पकडण्याचे पोलिसांना सांगितल आहे. लोक चिडलेले आहेत. या देशात माणूस आणि माणुसकी राहिली पाहिजे हे लक्षात घेतल पाहिजे. त्यांनी शाहु महाराजांच्या कोल्हापुरात दंगल करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर मध्ये बाहेरून लोक आणून दंगल केली. आपण संघटित राहील पाहिजे एकजुटीने राहील पाहिजे. इथला गरीब मराठा, धनगर, माळी, क्रिश्चन, मुस्लिम, बौद्ध, दलित, आदिवासी हा एकत्र राहिला तर हे आरएसएस वाले काही करणार नाहीत.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी