27 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरटेक्नॉलॉजीइस्त्रोच्या आदित्य एल 1 मोहिमेत पुण्यातील आयुका' संस्थेचा सहभाग; एकनाथ शिंदेंनी केले...

इस्त्रोच्या आदित्य एल 1 मोहिमेत पुण्यातील आयुका’ संस्थेचा सहभाग; एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

भारताच्या चांद्रयान 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर शनिवारी इस्त्रोने सुर्याच्या संशोधनासाठी आदित्य एल 1 या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. आदित्य एल 1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करत भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी अशी कामगिरी केली असल्याचे सांगत या मिशनमध्ये पुण्यातील ‘आयुका’ संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आदित्य एल- १ या पहिल्याच सुर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सुर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर प्रग्यान हे रोव्हर उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सुर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे. चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील स्थान बळकट झाले आहे. भारत हा जगातील असा चौथा देश ठरला आहे.

हे सुद्धा वाचा
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या एका अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येणार आहेत. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असणाऱ्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून वैज्ञानिक दृष्ट्या बलाढ्य असा देश अशी ओळख निर्माण झाली आहे. इस्त्रोच्या या कामगिरीला तोड नाही. या मोहिमेत सहभागी सर्व संशोधक – वैज्ञानिक, अभियंते आदींचे अभिनंदन, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी