27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरराजकीयप्रवीण दरेकरांनी मराठा आरक्षणाविषयी केले महत्वाचे वक्तव्य !

प्रवीण दरेकरांनी मराठा आरक्षणाविषयी केले महत्वाचे वक्तव्य !

राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर ओबीसी समाजाचे काही नेते मंडळी टीका करत असतानाच, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि राज्याचे माजी वनमंत्री रामदास कदम यांनीही टीका करण्याची संधी सोडली नाही. अशातच, भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर हे मराठा समाजाला  एकनाथ शिंदे आरक्षण देतील यावर आशावादी आहेत. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे सरकारच करेल,’ असा ठाम विश्वास भाजपचे विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी आज व्यक्त केला. मराठा समाजाला दुसऱ्या समाजाचे नव्हे तर स्वतंत्र आरक्षण हवेय हीच सार्वत्रिक भूमिका पुढे येत असल्याचेही दरेकर म्हणाले. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यात चर्चेला आला आहे. यासंदर्भात दरेकर यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांचा मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे, याबद्दल शंका नाही. समाज त्यांच्या भूमिकेसोबत आहे. तथापी अनेक भुमिका पुढे येताहेत. आज मराठा क्रांती मोर्चाने पत्रकार परिषद घेऊन सरसकट कुणबी दाखल्यावरसंदर्भात कोर्टाच्या निर्णयाचा दाखला दिला. त्यामुळे मराठा समाजाची भावना आज प्रत्येकजण बोलायला लागला आहे. मराठा समाजाची भुमिका ही कुठल्या दुसऱ्या समाजाचे आरक्षण रद्द करून नको अशी आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम आहेत. त्यांना समाजाची कुठलीही दिशाभूल करायची नाही. संविधानाच्या आधारे टिकणारे आरक्षण त्यांना द्यायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मराठा आरक्षणाविषयी भूमिकेवर कोणी संशय घेऊच शकत नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूने सकारात्मक भुमिका असणारे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. अजित पवार यांनीही मी सुद्धा मराठा समाजातून आलोय, समाजाप्रती माझ्याही संवेदना आहेत, असे स्पष्ट केले आहे. शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी कुठे मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात भुमिका घेतली? कुठे टाळाटाळ केली? परंतु त्यांना शास्वत आरक्षण द्यायचे आहे. मराठा समाजाची दिशाभूल करायची नाही हे समजण्याची गरज असल्याचे दरेकर म्हणाले.
हे सुद्धा वाचा
‘पृथ्वीराज चव्हाणांचे काम श्रेय मात्र आ. गोरेंना’, डॉ. रणजीतसिंह बरसले
शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी मंत्र्यांना ‘गर्दी’ जमवण्याचे लक्ष्य
अक्षय कुमारची स्कुटीवर हैदराबादची सफर! सहप्रवाशाला पाहून फॅन्स चक्रावले!

एकीकडे, जरांगे पाटील हे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी करत आहेत. पण राज्यातील ओबीसी नेत्यांचा त्याला विरोध आहे. राज्यात ओबीसीमधील विविध संघटना आंदोलन करत आहेत. एकीकडे धनगर समाजही आरक्षणाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे राज्यातील ९६ कुळी  मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र नकोय, असे नारायण राणे यांचे म्हणणे आहे. कोकणात कुणबी-मराठा अशी जात नाही. टी विदर्भात आहे. असे रामदास कदम म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी