33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीय'रोड टॅक्स देतो मग टोलचा भार कशाला', राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

‘रोड टॅक्स देतो मग टोलचा भार कशाला’, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्यात काही दिवसांपूर्वी ठाणे येथे मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी उपोषण केले होते. यावर सरकारने कानाडोळा केला होता. त्यासंबंधी राज ठाकरेंनी स्वतः भूमिका घेत उपोषण थांबवायला सांगितले. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सरकावर हल्ला केला आहे. टोलचा पैसा जातो कुठे? आपण रोड टॅक्स भरत असलो तरीही रस्त्यांवर खड्डे पडतात. मग हा सर्व पैसा जातो कुठ? असा सवाल राज ठाकरेंनी राज्यसरकारला केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आतापर्यंत सत्तेत असलेल्या नेत्यांनी टोलबंदीबाबत जनतेला आश्वासन दिलेले व्हिडीओ दाखवले. यानंतर त्यांनी मी मुख्यमंत्र्यांची जाऊन भेट घेणार असल्याचे राज ठाकरे बोलले होते. बोलल्याप्रमाणे राज ठाकरे हे (12 ऑक्टोबर) जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मनसे 2009 -10 या सालापासून टोलच्या समस्येबाबत आंदोलन करत आहे. याआधी सत्तेत असलेल्या नेत्यांनी प्रायव्हेट चारचाकी, टूव्हीलर गाड्यांचा टोल न घेण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे आता राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला असा रोखठोक सवाल केला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्यावरून आज राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. यावेळी रस्त्यांची देखील अवस्था व्यवस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

हेही वाचा 

भुजबळ खोटे बोलून शपथविधीला गेले, शरद पवारांचा पलटवार

शुभमन गिल पाकिस्तानविरोधात मैदानात?

‘नरेंद्र मोदी बापात बाप लेकात लेक ठेवणार नाहीत,’ प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

महिलांसाठी शौचालय का नाही?

टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र आता 2027 नंतर एमआरडीए टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये अशी मागणी करण्यात आली. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का? महिलांसाठी शौचालयं का नाही, असा सवालही त्यांनी केला. रस्त्यांची अवस्थादेखील चांगली नसल्याचा मुद्दाही या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी याबात आश्वासन दिले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, MH 04 या पासिंगच्या गाड्यांना टोल माफ कारायचा विचार सुरू आहे. यावर सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊन चर्चा करू असे एकनाथ शिंदे म्हणाले. तर वाशी आणि इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधा उभारण्यासाठी लवकरच एक समिति गठित करण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी