29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजनएल्विश यादवच्या अटकेवर ईशा मालवीयचं मोठं विधान, हात जोडून म्हणाली- 'मी सध्या...'

एल्विश यादवच्या अटकेवर ईशा मालवीयचं मोठं विधान, हात जोडून म्हणाली- ‘मी सध्या…’

एल्विश यादवला ((Elvish Yadav Arrested)) नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली. एल्विशच्या अटकेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता बिग बॉस 17 च्या ईशा मालवीया (Isha Malviya)ने एल्विश यादवच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ईशा मालवीयला या प्रकरणाबाबत विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी ईशा आणि एल्विशनी एकमेकांसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया खुप व्हायरल झाला होता. (Elvish Yadav Case)

एल्विश यादवला ((Elvish Yadav Arrested)) नोएडा पोलिसांनी सापांच्या विषाच्या तस्करी प्रकरणात अटक केली. एल्विशच्या अटकेने सर्वांनाच धक्का बसला आहे. अशा परिस्थितीत आता बिग बॉस 17 च्या ईशा मालवीया (Isha Malviya)ने एल्विश यादवच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ईशा मालवीयला या प्रकरणाबाबत विचारण्यात आले. काही दिवसांपूर्वी ईशा आणि एल्विशनी एकमेकांसोबतचा एक रोमँटिक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडिया खुप व्हायरल झाला होता. (Elvish Yadav Case)

एल्विश यादव आहे कोट्यवधींचा मालक, एका महिन्यात किती कमावतो?

अलीकडेच ईशा एका कार्यक्रमात स्पॉट झाली. यादरम्यान, ईशाला एल्विशला अटक करण्यात आली आहे का असे विचारण्यात आले तेव्हा तिने हसून हात जोडले आणि ‘अरे यार प्लीज’ म्हणाली. यानंतर ईशाला विचारण्यात आले की, तुम्ही त्याच्या पालकांची मुलाखत पाहिली आहे, ते खूप भावूक आहेत. तेव्हा ईशा म्हणाली, ‘नाही, मी सध्या संपर्कात नाही. मला आशा आहे की सर्व काही ठीक होईल. त्याच्या पालकांना बळ मिळो आणि एल्विशला देखील.’

 

View this post on Instagram

 

A post shared by F I L M Y G Y A N (@filmygyan)

काही दिवसांपूर्वी एल्विशने ईशासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये दोघे एकमेकांचा हात धरून बीचवर फिरताना दिसत होते. ईशाचे नुकतेच रिलीज झालेले ‘वे पागला’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत होते. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडीओ शेअर करताना एल्विशने लिहिले होते की, ‘काळाच्या बदलासोबत हृदय कुठं बदलतंय, तुमच्यावर प्रेम होता आणि राहणार.’

NCBचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी राखी सावंतच्या विरोधात ठोकला 11 लाखांचा मानहानीचा दावा

युट्युबर एल्विश यादवला. साप विष प्रकरणी पोलिसांनी अटक केली असून तो सध्या 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत आहे. माहितीनुसार, एल्विश यादवचे हे प्रकरण 2 नोव्हेंबर 2023 रोजी उघडकीस आले होते. जेथे एल्विश यादवचेही नाव एफआयआरमध्ये होते. तो रेव्ह पार्ट्या आयोजित करतो, असा आरोप आहे. या पार्ट्यांमध्ये नशेसाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो. पोलिसांनी छापा टाकून नोएडा सेक्टर 51 मधील बँक्वेट हॉलमधून अनेक सापही जप्त केले होते.

या प्रकरणी पोलिसांनी 17 मार्च 2024 रोजी एल्विश यादवला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या एल्विशच्या पालकांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात दोघेही मुलाखती देताना खूप रडतात. या दोघांचा व्हिडिओ पाहून सगळेच भावूक होत आहेत.

‘मुस्लिम ४ लग्न करू शकतात म्हणून ‘ते’ लोक जळतात का?’ UCC वर जावेद अख्तरचं खोचक विधान

एल्विश यादवने स्वतः बिग बॉसमध्ये इतिहास रचला आहे. तो बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सहभागी झाला होता. त्यांनी वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री घेतली होती. एवढेच नाही तर तो या सीजनचा विजेताही ठरला. मात्र या शोनंतर त्याचे नाव अनेकवेळा वादात सापडले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी