31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराजकीयराम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट, श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षांवार डागली तोफ

राम नवमीदिवशी राज ठाकरेंची खास पोस्ट, श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या पक्षांवार डागली तोफ

रामनवमीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी खास शुभेच्छा दिल्या आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या खास शैलीत श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या राजकीय पक्षांना टोलाही लगावला आहे. देशभरात राम नवमी मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. एकिकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तर दुसरीकडे आज सर्वत्र रामाचा गजर सुरु आहे.  (Raj Thackeray wished Shree Ram Navami facebook post viral)

भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली. ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो. असा प्रश्न उपस्थित करत राज ठाकरेंनी श्रीरामाचं अस्तित्व नाकारणाऱ्या राजकीय पक्षांवर तोफ डागली.

काय म्हणाले आहेत पोस्टमध्ये?

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.

भारतासारख्या खंडप्राय देशांत ऐक्य घडवणं हे तसे कठीण पण पिढ्यानपिढ्या ज्याला जसा श्रीराम भावला, तसा त्याने तो व्यक्त केला आणि त्यामुळे हा मर्यादापुरुषोत्तम देशाला बांधून ठेवणारी एक शक्ती ठरली.

ह्या शक्तीला किंवा तिच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम स्वतंत्र भारतात काही पक्षांकडून घडलं, ते का घडलं असेल देव जाणो.

धर्म, राजकारण, ईश्वर ह्यांची गल्लत हिंदूधर्मीयांकडून कधीच झाली नाही, आणि होणार देखील नाही. ह्याचं कारण श्रीराम असोत भगवान श्रीकृष्ण की शंकर हे माणसाच्या मनातील आदर्शांची, स्वप्नांची आणि त्यागाची प्रतीकं आहेत, ती धर्मप्रसाराची माध्यमं नव्हती. असो.

पण आज अयोध्येत राममंदिर उभं राहिलेलं असताना, आजची श्रीराम नवमी ही माझ्यासाठी विशेष आनंददायी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुन्हा एकदा सर्वाना रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी