38 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeव्हिडीओसर्वांना श्रीराम नवमीच्या लय भारीच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा .... 

सर्वांना श्रीराम नवमीच्या लय भारीच्या टीम कडून खूप खूप शुभेच्छा …. 

राम रामेति रामेति ,रमे रामे मनोरमे l    सहस्त्र नाम तत्त्युल्य राम  नाम वरानने ll

राम रामेति रामेति ,रमे रामे मनोरमे l
सहस्त्र नाम तत्त्युल्य राम  नाम वरानने ll
(Happy Ram Navami 2024).
यावर्षी ची राम  नवमी खूप खास आहे. अर्थातच अयोध्येच्या  राम मंदिरामुळे या राम नवमीला सर्वांमधे एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसतोय. अयोध्याच्या राम मंदिराकडे एक ऊर्जा स्रोत म्हणून भाविक पाहत आलेले आहेत.
रामनवमी विषयी थोडं विस्तृत स्वरूपात पाहुयात आपण…
मर्यादा पुरुषोत्तम , आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा आणि आदर्श शत्रू अशा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा कोण , असे विचारताच डोळ्यांसमोर येतेय ते श्रीराम .
रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात .
राम नवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो . या दिवशी मंदिरांत , मठांत  यज्ञ ,, हवन ,महाप्रसाद , यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने , माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते.
तुम्हा सर्वांना राम नवमीच्या पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा …..
पाहत राहा लय भारी …..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी