27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयभुजबळ फार्मची ड्रोनद्वारे रेकी

भुजबळ फार्मची ड्रोनद्वारे रेकी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ ( chagan bhujbal ) यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मची अज्ञाताने ड्रोनद्वारे रेकी केल्याच्या संशयातून अंबड पोलीस ठाण्यात सुरक्षा अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे भुजबळ फार्म ( Bhujbal Farm ) परिसरात पोलीस बंदोबस्तातही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. ड्रोन ( Drone ) नेमका कोणी उडविला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.नाशिक येथून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानावर ड्रोन कॅमेरा फिरल्या ने मोठी खळबळ उडाली आहे. ( Reconnaissance of Bhujbal Farm by drone )

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ड्रोन उडविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांच्या बंगल्याची ड्रोनच्या माध्यमातून पाहणी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
भुजबळ फार्म परिसरातील ड्रोन प्रकरणात सुरक्षा अधिकारी दीपक म्हस्के यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून, त्यानसार गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नाशिक परिसरातील जुने सिडको भागातील ना. छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या भुजबळ फार्मवर कॅमेरा ड्रोन दिसून आला. यात कॅमेरा ड्रोनच्या साहाय्याने रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने याप्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन घटनेची माहिती घेत तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, भुजबळ फार्मवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

यात कॅमेरा ड्रोनच्या साहाय्याने रेकी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्याने याप्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत व सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी भुजबळ फार्म येथे भेट देऊन घटनेची माहिती घेत तपासाचे आदेश दिले. त्यानुसार, अंबड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, भुजबळ फार्मवरील बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे.

ड्रोन कोणी आणि का उडविला? याचे कारण गुलदस्त्यात
ड्रोन कोणी आणि का उडविला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. ड्रोन उडविण्यासाठी कोणी परवानगी घेतली होती का? याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून वातावरण तापले असतानाच भुजबळ यांच्या बंगल्यावर ड्रोन उडाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी