31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeक्राईमवैद्यकीय शिक्षणाच्या बहाण्याने महिलेस लाखोंचा गंडा

वैद्यकीय शिक्षणाच्या बहाण्याने महिलेस लाखोंचा गंडा

कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला मॅनेजमेंट कोट्यातून नंबर लावून देतो, असे सांगून दोघांनी शहरातील एका महिलेस तब्बल साडेचौतीस लाख रुपयांना ( Woman duped of lakhs of rupees ) गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. दीड वर्ष उलटूनही नंबर न लागल्याने महिलेने पैशांसाठी तगादा लावला असता, संशयितांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वामन म्हात्रे (रा. रिजेन्सी इस्टेट, दावडी गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे) व कल्पना रघुनाथ पाटील (रा. प्रतीक रेसि., नाशिकरोड) असे संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत विशाखा दिनकर वानखेडे (रा. कॉलेज रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
( Woman duped of lakhs of rupees on pretext of medical education )

वानखेडे यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेणार असल्याने त्यांनी सन २०२२ मध्ये दोघा संशयितांची भेट घेतली होती. यावेळी संशयितांनी कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला नंबर लावून देण्याची ग्वाही दिली होती. या कामाच्या मोबदल्यात संशयितांनी ३४ लाख ६१ हजारांची रोकड स्वीकारली होती. शैक्षणिक वर्ष उलटूनही प्रवेश न मिळाल्याने वानखेडे यांनी विचारणा केली असता, संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत.

दीड वर्ष उलटूनही नंबर न लागल्याने महिलेने पैशांसाठी तगादा लावला असता, संशयितांनी शिवीगाळ करीत दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन वामन म्हात्रे (रा. रिजेन्सी इस्टेट, दावडी गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे) व कल्पना रघुनाथ पाटील (रा. प्रतीक रेसि., नाशिकरोड) असे संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत विशाखा दिनकर वानखेडे (रा. कॉलेज रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. वानखेडे यांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेणार असल्याने त्यांनी सन २०२२ मध्ये दोघा संशयितांची भेट घेतली होती. यावेळी संशयितांनी कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएसला नंबर लावून देण्याची ग्वाही दिली होती. या कामाच्या मोबदल्यात संशयितांनी ३४ लाख ६१ हजारांची रोकड स्वीकारली होती. शैक्षणिक वर्ष उलटूनही प्रवेश न मिळाल्याने वानखेडे यांनी विचारणा केली असता, संशयितांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी