30 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
HomeराजकीयVIDEO : आमदार रोहित पवार मंत्रीपदाबाबत म्हणतात, मतदारसंघासह राज्याची सेवा करता आली...

VIDEO : आमदार रोहित पवार मंत्रीपदाबाबत म्हणतात, मतदारसंघासह राज्याची सेवा करता आली तर आनंदच

सत्तार शेख: लयभारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर  : पक्षाने तसेच पक्षप्रमुखांनी माझ्यावर निवडणूक लढवण्याची जबाबदारी दिली होती. ती जबाबदारी मी जनतेच्या पाठबळावर यशस्वीरित्या पार पाडली आहे. मला लोकांसाठी काम करायचं आहे. सध्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. पक्षाच्या मनात असेल तर पक्ष मला राज्यात काम करण्याची संधी देईल तो निर्णय पक्षाचा असेल. पक्षाने दिलेली कुठलीही संधी पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून नक्कीच स्विकारेन, असे सुचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

राज्यातही कोणती संधी मिळाली तर तिथेही चांगले काम करून दाखवेन. शेवटी निवडून येत असताना कुठलेही पद डोक्यात नव्हते तर लोकांची सेवा होती. मतदारसंघासह राज्याची सेवा करता आली तर आनंदच होईल असे सांगत आमदार रोहित पवार यांनी राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्यास उत्सूक असल्याचे संकेत शुक्रवारी जामखेड दौर्यात दिले.

शुक्रवारी आमदार रोहितदादा पवार जामखेड दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ‘लय भारी न्यूज नेटवर्क’च्या प्रतिनिधीने आपणास राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाल्यास ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावर उत्तर देताना त्यानी वरिल विधान केले. आमदार पवारांच्या या वक्तव्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी