33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रमुंडे,महाजन,खडसे,फुंडकरांनी भाजपला बहुजन चेहरा दिलाय : एकनाथ खडसे

मुंडे,महाजन,खडसे,फुंडकरांनी भाजपला बहुजन चेहरा दिलाय : एकनाथ खडसे

टीम लय भारी

जळगाव : रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (Eknath khadse) यांना राष्ट्रवादी कडून विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. यानंतर एकनाथ खडसे (Eknath khadse) यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केले आहे. खडसे म्हणतात की, मला अनेकांनी सांगितले एकनाथ खडसे इतिहासात जमा झाले. अशी शक्यता असताना शरद पवारांनी माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी कोणाला उमेदवारी द्यायची हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला आहे.  एक काळ असा होता की, महाराष्ट्रात भाजप हा मारवाडी आणि ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता.

भाजपपासून महाराष्ट्रातील बहुजन समाज दूर होता. त्या काळात फरांदे सर, अण्णा डांगे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर आणि प्रमोद महाजन या नेत्यांनी भाजपचा चेहरा बदलला. गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाढवण्यासाठी संघर्ष केला. पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारणे हे दुर्दैवी आहे असं मत खडसे यांनी व्यक्त केले.

अडचणींच्या वेळेस हात देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी कायम यांचा ऋणी राहणार आहे,”  एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.  मला अडगळीत टाकण्यात आलं होतं,  अडचणीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने मला साथ दिली. त्यामुळे आता विधानपरिषदेची निवडणूक जिंकल्यानंतर माझं राजकीय पुनर्वसन करणाऱ्यांशी प्राामाणिक राहणे, ही माझी भूमिका असेल.

हे सुद्धा वाचा: 

भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ ठाकरे सरकार ’ स्वस्थ बसणार नाही : संजय राऊत

2 Weeks After Prophet Row, Case Against Suspended BJP Leader, A Owaisi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी