33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeक्राईमड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

ड्रगमाफिया ललित पाटील याची पोलीस कोठडी २७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज सकाळी ललित पाटील याला अंधेरी कोर्टात हजर केले होते. त्यानंतर पोलिसांच्या मागणीचा विचार करून कोर्टाने ललित पाटील याची कोठडी आणखी चार दिवसांनी वाढवून दिली आहे. ललित पाटील सोबत त्याचा साथीदार सचिन वाघ यांच्याही पोलीस कोठडीत २७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ललित पाटीलला १७ ऑक्टोबरला बंगळुरूमधून अटक केल्यानंतर १८ ऑक्टोबरला अंधेरी कोर्टात हजर केले होते. तेव्हा कोर्टाने त्याला २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज ही मुदत संपत असल्याने पोलिसांनी त्याला पुन्हा कोर्टात हजर करून रिमांड वाढवण्याची मागणी केली होती.

ड्रगमाफिया ललित पाटील यांच्या नाशिकमधील ड्रग फॅक्टरीवर मुंबईतील साकीनाका पोलिसांनी ७ ऑक्टोबरला छापा टाकला होता. तेव्हा त्या फॅक्टरीतून तब्बल ३०० कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते. तत्पूर्वी १ ऑक्टोबरला ललित पाटीलने पुण्यातील ससून रुग्णालयातून पळ काढला होता. अखेर १५ दिवसांच्या मागोव्यानंतर मुंबई पोलिसांना ललित पाटीलला अटक करण्यात यश आले. त्याला बंगळुरूमधून १७ ऑक्टोबरला अटक करून दुसऱ्याच दिवशी मुंबईत आणण्यात आले होते.

मुंबई पोलिसांनी ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांची कसून चौकशी सुरू केली असून बरीच धक्कादायक माहिती समोर येत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. मुख्य म्हणजे १८ ऑक्टोबरला अंधेरी कोर्टात ललित पाटीलला हजर करण्यासाठी नेत असताना ‘आपण पळून गेलो नाही तर पळवण्यात आले’, असे सांगितले होते. एवढेच नाही तर ‘सर्वांची नावे उघड करेन’, असेही कोर्टात हजर होण्यापूर्वी त्याने माध्यमांना लांबून सांगितले होते.  त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे खूप खोलवर असल्याची पोलिसांना जाणीव झाली. वास्तविक यंदा ऑगस्टपासूनच साकीनाका पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते.

दरम्यान, काल (२२ ऑक्टोबर) सकाळी ललित पाटील याला त्याच्याच नाशिक जिल्ह्यातील शिंदेवाडी गावातील ड्रग फॅक्टरीत आणून पोलिसांनी खूप माहिती गोळा केली. ललित पाटीलला नाशिकमध्ये आणताना मुंबई पोलिसांनी प्रचंड गुप्तता पाळली होती. नाशिक पोलिसांनाही त्याला नाशिकमध्ये आणत असल्याचे माहीत नव्हते.

हे ही वाचा

ललित पाटीलला आज नाशिकमध्ये का नेले होते?

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या ‘बारा’ भानगडी

नाशिक ड्रग्ज प्रकरण: आठ किलो सोन्याची खरेदी करणारा ‘तो’ कोण?

ड्रगमाफिया ललित पाटील नाशिकमधील आहे. ड्रगजच्या पैशांतून त्याने प्रचंड सोने खरेदी केले आहे. शिवाय नाशिकमध्ये अनेक मालमत्ता केल्या आहेत. याचीही पोलीस माहिती घेणार आहेत. शिवाय त्याच्या ड्रग फॅक्टरीचे रॅकेट किती मोठे आहे, त्याच्या डोक्यावर कुणाचा हात आहे, आदी सर्व माहिती पोलीस त्याच्याकडून घेत आहेत. त्यामुळेच पोलिसांची त्याची पोलीस कोठडी वाढवून मागितली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी