27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeक्रीडाआशियाई पॅरालम्पिक स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

आशियाई पॅरालम्पिक स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

भारत हा क्रिडा क्षेत्रात आपली चांगली छाप पाडत आहे. मग तो क्रिकेट असो की हॉकी नाहीतर पॅरालम्पिक मान्य खेळ. भारत आपली भुमिका नेहमी योग्य पद्धतीने बजावत असतो. सध्या चीन येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरालंम्पिक स्पर्धेत भारताने सुवर्ण कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताने २ सुवर्ण पदक आणि १ रौप्य पदक जिंकूण भारताचे नाव पॅरालम्पिक स्पर्धेत सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे. या स्पर्धेत आता शैलेश कुमार या खेळाडूने पुरूष विभागात T-63 उंच उडी स्पर्धेत २ सुवर्ण पदक जिंकले आहेत. तर मरियप्पन थांगावेलूने रौप्य पदक जिंकले.

शैलेश कुमारने अॅथलेटिक्स स्पर्धेत १.८० मीटर अंतर गाठून सुवर्ण पदक जिंकले आहे. तर T-42 उंच स्पर्धेत देखील सुवर्ण पदक जिंकले आहे. तर मरियप्पनचे ०.२ मीटर अंतर पार करण्यासाठी कमी पडले. १.८० मीटर एकूण अंतर कापल्याने त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे. तर निषाद कुमारने देखील उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याने पॅरालम्पिक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. भारताने ३ सुवर्ण, ३ कांस्य, ३ रौप्य पदके मिळवली आहेत. असे एकूण ९ पदकं जिंकली आहेत.

हे ही वाचा

‘कंत्राटी’वरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये ट्विटर वॉर!

दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार?

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

पॅरालंम्पिक स्पर्धा ही सध्या चीनमध्ये सुरू आहे. या स्पर्धेत निषाद कुमारने अफलातुन कामगीरी केली आहे. त्याने पुरुष T-47 गटातील उंच उडी स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. २.०२ मीटर अंतर पार करून सुवर्ण पदक मिळवले असून ऐतिहासिक नोंद केली आहे. त्याचप्रमाणे थ्रो बॉल स्पर्धेतही भारताने ३ पदके जिंकली आहेत. प्रणव सुरमा, धरमवीर, अमित कुमार यांना अनुक्रमे ३ पदके मिळली आहेत.

प्रणव सुरमा, धरमवीर, अमित कुमारने भारताला थ्रो बॉल स्पर्धेत प्रत्येकी एक पदक मिळवून दिले. म्हणजेच ३ पदके थ्रो बॉल स्पर्धेत मिळाली आहेत. यात सुरमा याने सुवर्ण पदक जिंकले असून धरमवीरने कांस्य पदक जिंकले आहे. अमित कुमारने रौप्य पदक जिंकले आहे.

आशियाई पॅरालम्पिकमध्ये १७ खेळांमध्ये ३०३ भारतीय खेळाडू सहभागी झाले आहेत. मोनू घंगासने पुरुषांच्या शॉटपुट एफ ११ स्पर्धेत १२.३३ मीटर फेक करत कांस्यपदक पटकावले आहे. त्याचप्रमाणे महिला कॅनोई VL2 स्पर्धेत भारताच्या प्राची यादव या महिला खेळाडूने रौप्य पदक जिंकले. चौथ्या आशियाई पॅरा खेळ स्पर्धेत भारताने आतापर्यंत ९ पदकांची कमाई केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी