30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeराजकीयअडचणीत वाढ, शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीने बजावले समन्स

अडचणीत वाढ, शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीने बजावले समन्स

टीम लय भारी

मुंबई: शिवसेना खासदार भावना गवळी (Bhawana Gawali) यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. गेल्या महिन्यात २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान(sayed khan) यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती (Shiv Sena MP Bhavana Gawli summoned by ED).

त्यानंतर आता पुन्हा एकदा भावना गवळी यांना ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. येत्या २० तारखेला अर्थात बुधवारी भावना गवळी यांना ईडीनं चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा उतरवला पाहिजे; फडणवीसांचा हल्लाबोल

ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही : किरीट सोमय्या

याआधी भावना गवळींच्या निकटवर्तींयांना देखील ईडीकडून समन्स बजावून चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे. ३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती.

टाटा पंच एसयूव्ही कारची किंमत कंपनीने केली जाहीर

Use of Central agencies against relatives of MVA leaders shows BJP’s ‘inhuman face’: Shiv Sena

Maratha Reservation

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी