35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयठरलं, 'या' दिवशी शिवाजी आढळराव पाटील अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार

ठरलं, ‘या’ दिवशी शिवाजी आढळराव पाटील अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार

लवकरच शिवाजी आढळराव पाटील ( Shivaji Adharao Patil ) आणि त्यांचे सहकारी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. अजित पवारांनी मुंबईत बोलावलेल्या बैठकीत आढळराव पाटलांचा प्रवेश निश्चित झाला आहे. अशी माहिती सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. मागील काही दिवसांपासून आढळराव पाटलांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली होती.( Shivaji Adharao Patil will join Ajit Pawar NCP on March 26)

प्रवेशानंतर आढळराव पाटील अजित पवार गटाच्या घड्याळ चिन्हावर लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळी 10 वाजता अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीला शिरूर लोकसभा मतदारसंघातील अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते. राज्याचे मंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार अतुल बेनके आणि काही पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक दोन तास सुरु होती.

यावेळी २६ तारखेला शिवाजी आढळराव पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. अशी माहिती तटकरे यांनी यावेळी दिली.

शिरुर लोकसभेची जागा महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. तर शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव पाटील या जागेवरुन लढण्यास इच्छुक असल्याने ते पक्षप्रवेश करत अमोल कोल्हे यांच्याविरोधात मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत शिवाजी आढळराव पाटील?

असलेले शिवाजी आढळराव पाटील हे मूळचे आंबेगावचे आहेत. भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. 2004, 2009 आणि 2014 साली त्यांनी शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवत मोठा विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2004 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत.

2019 मध्ये आढळराव पाटलांचा पराभव?

खासदार अमोल कोल्हे यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ही निवडणूक लढली होती. त्यावेळी त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्या लढत होणार असल्याचे चित्र आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी