32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
HomeराजकीयSonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

Sonia Gandhi : सोन‍िया गांधींची डोकेदुखी वाढली

काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी तयार झाली असून, दोन गट पडले आहेत. या दोन गटामध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहूल गांधी यांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसच्या 90 आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे.

काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत बंडाळी तयार झाली असून, दोन गट पडले आहेत. या दोन गटामध्ये धुसफूस सुरू आहे. त्यामुळे सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहूल गांधी यांची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसच्या 90 आमदारांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानच्या राजकारणात पर‍िवर्तन होतांना द‍िसत आहे. देशाच्या राजकारणात विविध प्रकारच्या घडामोडींना वेग आला आहे. अनेक राज्यात राजकीय राजकीय बदल घडतांना दिसून येत आहेत. राजस्थानमध्ये न भुतो न भविष्यती अशा घडोमीडी घडत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागण्याची शक्यता आहे.

त्यांच्या जागी मुख्यमंत्री पदासाठी सच‍िन पायलट दावा करत आहेत. जोधपूरमध्ये सचिन पायलट यांनी तर जोधपूरमध्ये नए युग की तैयारी….. अशा आशयाचे पोस्ट लावले आहेत. त्यामुळे सचिन पायलट मुख्यमंत्री बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता गेहलोत यांचा एक गट आणि सचिन पायलट यांचा एक गट तयार झाला आहे. 19 ऑक्टोबरपर्यंत गेहलोत यांचा गट कोणत्याही मीटिंगमध्ये सहभागी होणार नाही. गेहलोत यांच्या गटाने काही अटी ठेवल्या आहेत. यामध्ये गेहलोत गटातील मुख्यमंत्री झाला पाहिजे ही एक प्रमुख अट आहे. आता गेहलोत गटाकडे पक्षश्रेष्टी कसे पाहतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच काँग्रेसच्या एका आमदाराला कोणालाही भेटता येणार नाही, तर 120 आमदारांना एकत्रच भेटावे लागणार आहे अशी भूम‍िका गेहलोत गटाने घेतली आहे.
हे सुद्धा वाचा

Shinde government : शिंदे सरकारने काढला गरीबांच्या तोंडातला घास

Shivpratap Garudjhep Trailer: अमोल कोल्हेंच्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

School Bus Accident : … आणि बघता बघता स्कूल बस उलटली, पालकांची पळापळ

काँग्रेसच्या आमदारांना भेटण्यासाठी सोन‍िया गांधीनी अजय माकन आणि मल्ल‍िकार्जुन खरगे यांना पाठवले होते. मात्र आमदारांनी त्यांच्याशी बोलण्यास नकार दिला. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसच्या अध्यक्षपादासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. कारण हे पूर्वी झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ठरलेले होते. चिंतन शिबिरात ठरल्याप्रमाणे एका व्यक्तीला एका वेळी एकच पदावर राहता येणार आहे. त्यामुळे गेहलोत यांना मुख्यमंत्रीपद गमावावे लागू शकते. अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलट हे मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. मात्र गेहलोत समर्थक आमदारांनी विरोध केला आहे. त्याच मुद्यावर गेहलोत गटाच्या तब्बल 92 आमदारांनी आपला राजीनामा दिला आहे.

92 आमदारांनी राजीनामा दिल्याने राजस्थानमधील काँग्रेसचे सरकार अस्थिर बनले आहे. या बंडखोर नेत्यांची पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा सुरू आहे. तर राहूल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. अनेकांनी 2020मध्ये राजकीय संकटात असतांना ज्यांनी सरकार वाचवण्यासाठी मदत केली त्यांना मुख्यमंत्री बनवावे असे या गटाचे मत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी