30 C
Mumbai
Tuesday, June 18, 2024
Homeमहाराष्ट्रशिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक : उद्धव ठाकरे

शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राचा सर्जिकल स्ट्राइक : उद्धव ठाकरे

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने सर्जिकल स्ट्राइक केला. अशा शब्दात टिकास्त्रं सोडलं.

उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो, रात्रीस खेळ चाले आमच्याकडे नाही. शिवसेनेवर जनादेशाच अनादर केल्याचा आमच्यावर आरोप होतो पण शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते असेही उध्दव ठाकरे म्हणाले. मी पणा विरुद्ध ही लढाई आहे. पाठित वार करण्याचा प्रयत्न करु नका. असेही उध्दव ठाकरे म्हणाले. केंद्र सरकारची दिल्लीमध्ये रात्री बैठक झाली. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करायचं होतं का? अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी मोदी सरकारवर तोफ डागली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी