29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeराजकीयआरोग्य सेविकांसाठी मंत्री तानाजी सावंतांकडून गोड भेट !

आरोग्य सेविकांसाठी मंत्री तानाजी सावंतांकडून गोड भेट !

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या स्वयंसेवसेविकांच्या मानधनाच्या वाढीबाबत अनेक वर्षांपासून ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. यामुळे आशा स्वयंसेविकांना या योजनेचा काही वर्षांपासून लाभ होतोय. यामुळे आता ८० हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक नाही, दोन नाही तर तब्बल ७ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली. तर ३ हजार ६६४ गट प्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधनात वाढ झाली. त्याचबरोबर त्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज मुंबई येथे केली. यामुळे आरोग्य स्वयंसेविकांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

मुंबईतील आरोग्यसेवा कार्यालयात आशा स्वयंसेविका आणि संघटनेचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी ही घोषणा केली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव श्री. मिलिंद म्हैसकर, सहसंचालक सुभाष बोरकर, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक श्री. धीरज कुमार, सहसंचालक तुलसीदास सोळंके यांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


राज्यात काही वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत ‘आशा सेविका’ योजनेची अंमलबजावणी होत आहे. सद्यस्थितीत राज्यात ८० हजारांहून अधिक आरोग्य सेविका कार्यरत आहेत. आतापर्यंत या आशा सेविकांना ५ हजार रुपये प्रतिमाह वेतन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज या मानधनात ७ हजार रुपयांची भरघोस वाढ करण्याची घोषणा केली. या आशा आरोग्य सेविकांना केंद्र शासनामार्फत ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५ हजार रुपये अखंड मानधन मिळणार आहे.

हे ही वाचा

भारत आणि श्रीलंका सामन्यापूर्वीच भारताच्या डोकेदुखीत वाढ

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

विजयाची ‘सप्तपदी’ आणि कोहलीच्या रेकॉर्डची आस

राज्यात ३ हजार ६६४ गट प्रवर्तक कार्यरत असून आतापर्यंत त्यांना ६ हजार २०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्र्यांनी आज ६ हजार २०० रुपयेच मानधनात वाढ जाहीर केली. गट प्रवर्तकांना केंद्र शासनाकडून ८ हजार ७७५ रुपये मानधन मिळत होते. मात्र आता त्यांना २१ हजार रुपये इतके एक हाती मानधन मिळणार आहे. याशिवाय या बैठकीत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना २ हजार रुपयांची दिवाळी भेट देणार असल्याचीही घोषणा आरोग्य मंत्री प्रा डॉ. सावंत यांनी केली आहे. यामुळे आता आरोग्य सेविकांची दिवाळी आता गोड होणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी