33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeएज्युकेशनदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या तयारीला लागा

शैक्षणिक टप्प्यात इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष फार महत्वाचे असते. दहावी आणि बारावी इयत्तेत गेलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात सतत परीक्षेची चिंता असते. मात्र या परिस्थितीतून विद्यार्थ्यांना जावे लागते. शाळेत घेतल्या जाणऱ्या परीक्षेप्रमाणे जरी ही परीक्षा असली तरीही भविष्याच्या दृष्टीने दहावी-बारावीचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी लाखमोलाचे असते. यामुळे आता दहावी आणि बारावीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या महाराष्ट्र राज्य मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षा घेण्यात येणार आहे. तर या परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सुरु होणार आहेत. या परीक्षांच्या तारखा आता समोर आल्या आहेत. यामुळे आता विद्यार्थ्यांनो तयारीला लागा.

महाराष्ट्र राज्य मंडळाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून परीक्षांच्या तारखांबाबत माहिती समोर आली असून फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये परीक्षा असतील असे महाराष्ट्र राज्य मंडळाने सांगितले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या १ मार्च ते २६ मार्च दरम्यान होणार आहेत. तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत होणार आहेत. मुंबई, नाशिक, अमरावती, पुणे, कोल्हापूर, लातूर, कोकण, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळातर्फे परीक्षा घेण्यात येणार असून दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांविषयी माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे. त्याचप्रमाणे लेखी परीक्षांबरोबर अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षांची माहिती शिक्षण मंडळाने दिली.

हे ही वाचा

धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सुटतात फटाफट

मराठा आरक्षणाच्या लढाईत बॉलिवूडची उडी

टिकणारे आरक्षण देणार; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती

अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा या दिवशी

इयत्ता दहावीची तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ आणि बारावीची तोंडी परीक्षा,अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ही २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहे. लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत होतील. त्याची तारीख वेळ याबाबतची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने  दिली आहे.

अधिकृत वेबसाईटवर मिळणार वेळापत्रक

दहावी-बारावीचे विद्यार्थी आपल्या बोर्डाच्या परीक्षेची वाट पाहत बसले. परीक्षेची तारीख समोर आल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रकाबाबत माहिती हवी असल्यास www.mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्यावी. याबाबतची माहिती सहज उपलब्ध होणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी आणि बोर्डाच्या वेळापत्रकाचा वापर करावा. वेळापत्रक हे शाळेत/ विद्यालयात लावले जाईल. त्या वेळापत्रकाची पुष्टी करूनच परीक्षेबाबत माहिती मिळवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी