32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeराजकीयमहाराष्ट्रातदेखील मणिपूरसारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न-राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

महाराष्ट्रातदेखील मणिपूरसारखे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न-राष्ट्रवादीचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

अनेकांनी बलिदान दिल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र आज स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापन दिन साजरा करत असताना खरंच स्वातंत्र्य उरलं आहे का? असा प्रश्न सध्या जनतेला पडला आहे. याला सध्या देशांमध्ये आणि महाराष्ट्रात असलेली परिस्थिती कारणीभूत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद तथा नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे मणिपूर पेटवले गेले त्या ठिकाणी महिलांवर झालेला अत्याचार मात्र तरी देखील स्थानिक सरकार आणि केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही, तर दुसरीकडे महाराष्ट्रातदेखील अशाच प्रकारे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज या देशात द्वेषाचं राजकारण एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे की माणुसकी उरणार की नाही असा प्रश्न पडला आहे. हे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्याला आपली लोकशाही टिकवावी लागेल. सध्या सर्वात मोठा हल्ला हा लोकशाहीवर होत आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला आहे.

आजच पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, मी पुन्हा येईल. जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला यांना पुन्हा सत्तेवर येण्यापासून रोखले पाहिजे, तरच लोकशाही टिकवता येईल. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणारदेखील नाही. जेव्हा केव्हा हिमालय अडचणीत आला त्यावेळी मदतीला सह्याद्री मदतीसाठी धावून गेला आहे. लोकशाहीच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी आतापासूनच तयारीला लागायला पाहिजे असेही देखील जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी म्हटले आहे.
हे सुद्धा वाचा
भाजपने सुरू केली मनसेलाही एनडीएच्या गोटात ओढण्याची तयारी, राज ठाकरे यांचा गौप्यस्फोट
‘राष्ट्रपती पोलीस शौर्य’ पदकावर गडचिरोली पोलीस दलाची मोहर ; एकट्या गडचिरोलीत ३३ जवानांना पदके
कळवा हॉस्पिटलचे ऑडिट करा; एसआयटी चौकशीची शिवसेना ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखाची मागणी

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आतापर्यंत 27 रुग्ण दगावले आहे. मात्र राज्य सरकार यावर कुठलेही ठोस भूमिका घ्यायला तयार नाही आहे. रुग्णालयातील बेजबाबदार, जबाबदार व्यक्तींवर तातडीने कारवाई करण्यात यावी यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाण्याचे असल्याने मी त्यांना ठाण्यातील एक नागरिक या नात्याने विनंती करतो की त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करावी असे देखील जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी