35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; बड्या नेत्यांना दिली संधी

ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; बड्या नेत्यांना दिली संधी

गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) उमेदवारांच्या घोषणेची चर्चा सुरु होती. अखेर आज ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर झाली. ठाकरेंनी लोकसभेसाठी (Lok sabha) गटातील बड्या नेत्यांना संधी दिली आहे. सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना संधी देण्यात आली आहे. तर ठाण्यातून राजन विचारेंना संधी देण्यात आली आहे.(Uddhav Thackeray Group First List Of Lok sabha Candidates Announced)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. राऊत यांनी ट्विट करत उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. ‘हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.’ अशी माहिती त्यांनी कॅप्शनमध्ये दिली आहे.

ठाकरे गटाकडून आज लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण अद्याप 4 ते 5 जागांवरील उमेदवारांची घोषणा झालेली नाही. वंचितच्या भूमिकेनंतर या चार ते पाच जागांवरील निर्णय घेण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे, पवार व ठाकरेंनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा: नाना पटोले

कल्याणमध्ये महायुतीकडून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंविरोधात ठाकरे गटाकडून केदार दिघेंना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याणमध्ये ठाकरेंकडून लोकसभेच्या रिंगणात कोण उतरणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

उद्धव ठाकरे महाविकासआघाडीसोबत असले तरी, ठाकरेंची ताकद मुंबईत पाहायला मिळते. त्यामुळे मुंबईत जास्त जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाला मुंबईत एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबईची. इथले विद्यमान खासदार राहुल शेवाळे हे शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत. उर्वरित पाच जागांवर भाजप आपले उमेदवार उभा करु शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी