35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeनिवडणूकठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर या १७ जणांना मिळाले तिकीट

ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर या १७ जणांना मिळाले तिकीट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी टिटूरवरून उमेदवारांची घोषणा केली आहे. दक्षिण मद्य मुंबईतून अनिल देसाई उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर उत्तर पूर्व मुंबईतून संजय दीना पाटील नाशिकमधून राजाभाऊ वाजे तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे याना तिकीट देण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर येत आहे. मुंबई दक्षिण मद्य येतुन अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे असे ट्विट संजय राऊत यांनी केली आहे.
(Thackeray group releases Lok Sabha candidate list of 17)

ठाकरे गटाची उमेदवार यादी

दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर
दक्षिण मद्य मुंबई – अनिल देसाई
ठाणे – राजन विचारे
नाशिक – राजाभाऊ वाजे
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
हिंगोली – नागेश पाटील
परभणी – संजय राऊत
सांगली – चंद्रहार पाटील
मावळ – संजोग वाघेरे
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी