30 C
Mumbai
Wednesday, August 2, 2023
घरराजकीयभिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे

भिडे गुरुजी आम्हाला गुरुजी वाटतात; उपमुख्यमंत्री फडणवीस यांना संभाजी भिडे प्यारे

संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अमरावतीमध्ये बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्या नंतर गेल्या तीन दिवसांपासून भिडे यांच्या विरोधात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना( ठाकरे गट) रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. भिडे यांना अटक करावी अशी मागणी राज्यात जोर धरू लागली आहे. असे असताना या प्रकरणाचे पडसाद आज ( २ ऑगस्ट) विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. दोन्ही सभागृहात भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. पण याबाबत निवेदन करताना, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भिडे यांनी पाठराखण केल्याचे पहायला मिळाले.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात आणि ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चौकशी करत आहे मात्र कोणीही कोणत्याही राष्ट्रपुरुषांची केलेली बदनामी खपवून घेतली जाणार नाही मग ती सावरकरांची असो की महात्मा गांधींची असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले.

मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या मागणीनंतर सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या पुस्तकातील काही उतारे वायरल होत असल्याचे सांगितले आहे तर त्यांचे एक भाषण व्हायरल होत असून त्या भाषणात त्यांनी ज्योतिबा फुले यांची आणि महात्मा गांधी यांचे बदनामी केल्याचे दिसून येत आहे. मात्र हे भाषण अमरावती जिल्ह्यातील केलेल्या सभेतील नाही ते अन्य ठिकाणचे आहे त्याबाबतचे आवाजाचे नमुने पोलीस तपासत असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.

संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी करण्यात येईल त्यांची वक्तव्य तपासली जात आहेत. आवाजाचे नमुने तपासले जात आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. संभाजी भिडे हे धर्मासाठी कार्य करतात. बहुजनांना शिवरायांचा इतिहास समजावा यासाठी कार्यकर्ता म्हणून त्यांचे कार्य चांगले असल्याचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला, मात्र जर त्यांनी आक्षपार्ह वक्तव्य केले असेल तर कारवाई केली जाईल असेही फडणवीस आणि सभागृहात स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा 
बीडीडी चाळीत वाढलल्या मुलाने बॉलीवुडला हवेली, महालांचे भव्य दर्शन घडविले

कुठे जात आहोत आपण? आपल्या देशाची आपल्याला ओळख आहे का?

धार्मिक द्वेषातून रेल्वेमधील हत्याकांड; भर पावसात आमदार आव्हाडांचे मूक निदर्शने

मनोहर कुलकर्णी यांचा वारंवार संभाजी भिडे गुरुजी असा उल्लेख देवेंद्र फडणवीस करत होते. याला पृथ्वीराज चव्हाण आणि यशोमती ठाकूर यांनी आक्षेप घेतला अशा व्यक्तीला गुरुजी संबोधने योग्य नाही तो गुरुजी आहे याचा पुरावा आहे का असे पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारले. या संदर्भात उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की तुम्हाला पृथ्वीराज बाबा म्हणतात आता तुम्हाला बाबा का म्हणतात याचा काही पुरावा आहे का त्यामुळे गुरुजी म्हणतात पुरावा काय हवा.. ते आम्हाला गुरुजी वाटतात म्हणून आम्ही गुरुजी म्हणतो असे उत्तर दिले. यामुळे सभागृहामध्ये एकच गदारोळ झाला. विरोधकांना यावेळी बोलू न दिल्याने विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी