26 C
Mumbai
Wednesday, September 27, 2023
घरमहाराष्ट्रधार्मिक द्वेषातून रेल्वेमधील हत्याकांड; भर पावसात आमदार आव्हाडांचे मूक निदर्शने

धार्मिक द्वेषातून रेल्वेमधील हत्याकांड; भर पावसात आमदार आव्हाडांचे मूक निदर्शने

जयपूर- मुंबई एक्सप्रेसमध्ये केवळ धार्मिक आणि जातीय द्वेषातून चार जणांची हत्या एका आरपीएफ जवानाने केली. या हत्याकांडातून बुद्ध- गांधीच्या देशात आता दुहीची बिजे रोवली जात आहेत. असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भर पावसात मूक निदर्शने केली. सोमवारी जयपूरहून निघालेल्या रेल्वेगाडीत आरपीएफचा जवानाने आपले वरिष्ठ अधिकारी मीना यांच्यासह चार जणांवर गोळीबार केला. त्यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला. गोळीबार केल्यानंतर मृतदेहाजवळ उभे राहून त्याने धर्मांधतेचे भाष्य केले. केवळ धार्मिक द्वेषातून त्याने चारजणांचे जीव घेतले असल्याने या विद्वेष पसरविणार्‍या प्रवृत्तींविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये धर्मांधता दिसून येत आहे. काल एका आरपीएफ जवानाने गोळीबार करून चारजणांचे जीव घेतले. या घटनेतून आपण काय पेरलं आणि काय उगवलं, हे बघण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने महात्मा गांधींना मानले तेव्हा नथुरामाचे हात थरथरले नव्हते. आता असे अनेक नथुराम जन्माला येत आहेत. त्यांचेही हात थरथरत नाहीत. या देशात मुहमे राम आणि पेट मे नथुराम अशी प्रवृत्ती वाढीस लागली आहे. म्हणूनच मणीपूरमध्ये भगिनींना विवस्त्र फिरवण्यात आले. ही माणुसकी नाही. आता ट्रेनमध्ये जे झाले ते भयानक आहे.

हे सुद्धा वाचा 

मोंदीच्या पुरस्कार सोहळ्यात शरद पवारांनी भाषणात दोन मुद्दयांवर वेधले लक्ष
गुजरात नरसंहाराने भाजपाला केंद्रात बसवले, तेच मॉडेल ईशान्य भारतात आयात केले – प्रकाश आंबेडकर
मणिपूर महिला अत्याचार प्रकरण : सरन्यायाधीशांनी विचारले 14 दिवस पोलिसांनी काहीच का केले नाही?

त्या जवानाने माणसे शोधून शोधून मारली. आता पोलीस सारवासारव करीत आहेत की तो वेडा आहे, आजारी आहे. मग, जर तो वेडा , आजारी होता. तर त्याच्या हातात बंदूक का दिली? आपल्याकडे होत असलेली राजकीय घसरणच धर्मांधता वाढवत आहे. देशात गांधींचे विचार, संविधान पायदळी तुडवले जात आहेत. म्हणूनच संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायाशी शांततेत बसून जे पोरके झालेत त्यांना बोलके करण्याचा प्रयत्न केला आहे. असेही आव्हाड यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी