28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
Homeराजकीयवंचित बहुजन आघाडीला महाविकास आघडीकडून हिरवा कंदील

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघडीकडून हिरवा कंदील

सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. अशातच आता देशाप्रमाणे राज्यातही मोदी सरकारला शह देण्यासाठी सर्वच पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचं स्वप्न पाहत आहेत. गेली अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी तू तू आणि मे मे सुरू असलेलं पाहायला मिळालं आहे. मात्र आता जसजसे निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तसे वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याबाबत माहिती समोर येत आहे. यावर आता शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. याबाबतचे पत्र कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

अनेक महिन्यांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमध्ये समावून घेण्याबाबत अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये विचारविणीमय सुरू होता. त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीला हिरवा कंदील भेटला आहे. यावेळी माहिती पत्राद्वारे समोर आली आहे.

हे ही वाचा

पुष्कर जोगचं ‘ते’ विधान आणि मनोरंजन क्षेत्रातून संतापाची लाट

मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण मिळवून देणार – मनोज जरांगे – पाटील

‘महाराष्ट्राविरोधी शक्तींचा डोळा’, हिरे व्यापारानंतर मुंबईतील चित्रपट उद्योग गुजरातकडे

काय लिहिलं पत्रामध्ये?

‘देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वत देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे.

दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे’.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी