35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeराजकीयरात्रीस खेळ चाले; तीन बड्या नेत्यांसोबत बैठक झाली अन् विजय शिवतारे नरमले;...

रात्रीस खेळ चाले; तीन बड्या नेत्यांसोबत बैठक झाली अन् विजय शिवतारे नरमले; नेमकं घडलं तरी काय?

बारामतीत अपक्ष निवडणुक लढविणारच, माघार नाही असं वक्तव्य करणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) अचानक माघार घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत विजय शिवतारे यांची बैठक पार पडली. त्यांच्या भेटीचं फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर तोफ डागणारे शिवतारे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळं, पवार शिवतारे याचं मनोमिलन झाल का? शिवतारे खरच बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का? असं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

बारामतीत अपक्ष निवडणुक लढविणारच, माघार नाही असं वक्तव्य करणारे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) अचानक माघार घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत विजय शिवतारे यांची बैठक पार पडली. त्यांच्या भेटीचं फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवारांवर तोफ डागणारे शिवतारे आता बॅकफूटवर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळं, पवार शिवतारे याचं मनोमिलन झाल का? शिवतारे खरच बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेणार का? असं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. (Vijay Shivtare met Maharashtra Eknath Shinde Devendra Fadnavis with Ajit Pawar)

मिळालेल्या माहितीनुसार, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत विजय शिवतारेंची विशेष बैठक पार पडली. बैठकीवेळी शिवसेना आमदार भरतशेठ गोगावले हेदेखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवतारे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज: नाना पटोले

भेटीनंतर राजकी वर्तुळात शिवतारे फडणवीसांच्या मनधरणीनंतर बारामतीतून माघार घेण्याचा निर्णय घेणार आहेत. तसेच ते आता बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

बारामतीमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची शिवतारेंनी घेतली होती भूमिका

बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार ही प्रतिष्ठेची लढाई असल्यामुळं संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडं लागलं आहे. अशातच, या मतदारसंघातनू आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका माजी मंत्री विजय शिवतारे यांनी घेतली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका देखील केली होती.

कोणत्याही परिस्थितीत मी बारामती निवडणूक लढवणारचं असा निर्धार शिवतारेंनी केला होता. मात्र, रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवतारेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक तोडगा निघल्याचे बोलेल जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी