29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे...

देवेंद्र फडणवीस यांच्या तीन वर्षापूर्वीच्या तक्रारीचे काय? राष्ट्रवादी नेत्यांनी उभे केले नवे प्रश्न

टीम लय भारी

मुंबई: काल बुधवारी महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीने छाप टाकली. त्यांनतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले, आणि मात्र आठ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. या अटकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधले राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे.(What about Devendra Fadnavis’ complaint three years ago)

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील अ‍ॅक्सिस बँक प्रकरण उकरून काढले जाण्याची शक्यता दिसतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले असून ते म्हणाले, अ‍ॅक्सिस बँक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार दाखल करण्यात होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झालीच नाही.

 ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी भाजप विरोधी पक्ष देवंद्र फडणवीस यांच्यावर टिका करत लिहिले आहे की, नेते  ४ सप्टेंबर २०१९ म्हणजे तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ईडी कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ईडी ने बोलावले नाही. मग ईडी नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?, असा सवाल उपस्थित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते नवाब मलिक यांच्या अटकेनंतर जल्लोष करणे मोहित कंबोज यांना हे प्रकरण चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर मोहित कंबोज यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. आता हे सर्व बाहेर येत असून पुढे अजून काय घडेल याकडे सर्व वळले आहे.

हे सुद्धा वाचा

मलिकांच्या समर्थनार्थ मंत्रालयाबाहेर ‘मविआ’चे आंदोलन सुरू

वडिलांच्या अटकेनंतर सना मलिकचा भाजपवर निशाण, लवकरच आणखी घोटाळे बाहेर काढू

दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे, पाटीलवर हल्लाबोल

NCP leader Amol Kolhe plays Godse in short film, puts party in a fix

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी