33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजन'सिंघम अगेन 'मध्ये 'टायगर श्रॉफ'ची एन्ट्री

‘सिंघम अगेन ‘मध्ये ‘टायगर श्रॉफ’ची एन्ट्री

बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांचची उत्सुकता वाढवणारा ‘टायगर श्रॉफ’चा बहुचर्चित गणपती शुक्रवारी प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रेक्षकांना ॲक्शनचा धमाका पाहायला मिळणार आहे. २०० कोटी रुपयांचे बचत असलेल्या ‘गणपत’ चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या आदल्या दिवशीच टायगर श्रॉफने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. ‘सिंघम अगेन’ चित्रपटात टायगर श्रॉफची एन्ट्री झाली आहे. ‘सिंघम’ या मूळ चित्रपटाचा अभिनेता अजय देवगण, ‘सिंबा’ चित्रपटातील रणवीर सिंग, ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील अक्षय कुमार असे रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या तीन चित्रपटातील महानायक अगोदरच ‘सिंघम अगेन ‘ चित्रपटात एकत्र आले आहेत. आता टायगर श्रॉफ ‘सिंघम अगेन’ चित्रपटात नेमकं काय करतो आहे, याबाबत मात्र दिग्दर्शक रोहित शेट्टीने कोणतीच माहिती दिलेली नाही.

‘सिंघम अगेन ‘मधील ‘टायगर’चा लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. डोळ्यांवर काळा गॉगल, काळी बनियान, काळी पॅन्ट आणि काळे शूजसह हातात मोठी बंदूक घेतलेला टायगर चा फोटो सिनेमाच्या संपूर्ण टीमनं प्रदर्शित केला. हा फोटो पाहताच चित्रपटात टायगर श्रॉफ वेगवेगळे ॲक्शन स्टंट करणार असल्याचं समजतं. चित्रपटात टायगर श्रॉफच्या व्यक्तिरेखाचं नाव एसीपी सत्य आहे. चित्रपटातील आपल्या लूकचा फोटो पहिल्यांदा टायगरनेच इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. “सिंघम सर,एसीपी सत्य कामावर हजर आहे.” अशी कॅप्शन टायगरनं लिहिली. या पोस्टवर रणवीर सिंगनं प्रतिक्रिया दिली, ” गर्जना करण्याची वेळ झाली आहे. भावा, आता करूनच दाखवूया. ” टायगरची बहीण कृष्णा आणि आई आयेशा श्रॉफ यांनी टायगरच्या पोस्टवर ‘दिल’चं चिन्ह पोस्ट केलं. “फोटो खरंच छान आहे”, या शब्दात आयेशा श्रॉफ यांनी टायगरची प्रशंसा केली. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील लेडी सिंघम दीपिका पादुकोणचा लुक प्रदर्शित करण्यात आला होता.

हेही वाचा

‘या’ उद्योगपतीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

ड्रगमाफिया ललितच्या पोटात अनेक गुपिते; कोठडीत शुक्रवारपर्यंत वाढ

चंद्रशेखर बावनकुळेंचे वाभाडे; काय म्हणाले शरद पवार?

सध्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा शूटिंग सुरू आहे. महिन्याभरा अगोदरच चित्रपटाचे मुख्य नायक आणि नायिका अजय देवगन आणि करीना कपूर खान हैदराबादला पोहोचले. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. करीनाचा शूटिंग पूर्ण झाल्यानंतर ती आता मुंबईत परतली. सध्या अजय देवगन आणि अक्षय कुमार हैदराबाद येथे शूटिंगसाठी थांबले आहे. महिन्याभरापासून टायगर श्रॉफ ‘गणपत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दीपिका नुकतीच पॅरिसहून मुंबईत परतली. दीपिका आणि रितिक रोशन ‘फायटर’ सिनेमाच्या शूटिंगसाठी पॅरिसला होते. मुंबईत परतल्यानंतरही ‘फायटर’ सिनेमाचं शूटिंग सुरू आहे.

टायगर आणि रणवीर सिंग, दीपिका पादुकोण ‘सिंघम अगेन’शूटिंग कधी सुरू करणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे ॲक्शन सीनसाठी मोठा सेट उभारण्यात आला आहे. चित्रपटातील महत्त्वाच्या ॲक्शन सीन्सचं शूटिंग हैदराबाद येथे पार पडेल. रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, आणि टायगर श्रॉफ लवकरच हैदराबाद येथे शूटिंगसाठी येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी