25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराष्ट्रीय'या' उद्योगपतीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

‘या’ उद्योगपतीचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू

भारतातील एक मोठ्या उद्योगपतीचे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात निधन झाले आहे. पराग देसाई असे या उद्योगपतीचे नाव असून काल (रविवारी) त्यांनी खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठवड्यात त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. त्यानंतर काल संध्याकाळी थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. पराग देसाई हे वाघ-बकरी चहा उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक होते. वाघ-बकरी चहाला ब्रँड व्हॅल्यू मिळवून देण्यात पराग देसाई यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी वाघ-बकरी चहाचा देशात विस्तार केलाच शिवाय जगभरात चहाची गोडी लावली. त्यामुळे त्यांच्या निधनाने देशाने एक हरहुन्नरी उद्योगपती गमावल्याची प्रतिक्रिया उद्योगसमूहातून येत आहे.

पराग देसाई हे उद्योग जगतातील एक उमदे व्यक्तिमत्व होते. ते अवघ्या ४९ वर्षांचे होते. १५ ऑक्टोबरला ते अहमदाबामधील इस्कॉन अंबली रोडवर सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने पराग देसाई गांगरून केले आणि ते कोसळले. त्यातच त्याचे ब्रेन हॅमरेज झाले. ही घटना एका सुरक्षारक्षकाने त्यांच्या कुटुंबीयांना कळवल्यानंतर जखमी पराग देसाईंना तातडीने शेलबाय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना झायडस रुग्णालयात हलवण्यात आले. पण ब्रेन हॅमरेजमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालीच नाही. आठ दिवस ते व्हेन्टिलेटरवर होते. अखेर रविवारी (२२ ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा त्यांचे निधन झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परिषा आहेत.

पराग देसाई हे उच्चविभूषित होते. त्यांनी अमेरिकेतील लाँग आयलंड युनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीए केल्यानंतर घरच्या वाघ-बकरी चहा समूहात १९९५ मध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी वाघ-बकरी चहाला ब्रँड बनवला, तो लोकांपर्यंत पोहोचवला. शिवाय त्यांनी वाघ-बकरी चहा देशात पोहोचवण्याचा निर्धार केला. अल्पावधीतच त्यांनी वाघ-बकरी चहा कंपनीचा विस्तार देशातील २४ राज्यांत केला. शिवाय एक-दोन नाही तर तब्बल ६० देशांमध्ये वाघ-बकरी चहाची निर्यात सुरू झाली. अल्पावधीतच कंपनीची उलाढाल दीड हजार कोटींवर नेण्यात पराग देसाई यांचा सिंहाचा वाटा होता. पराग देसाई यांच्यामुळे गुजरातमधील ही एक छोटी कंपनी देशपातळीवर ओळखली जाऊ लागली.

हे ही वाचा

अग्निवीर योजनेवरून रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली

दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या नातवाचे निधन

परीक्षेत कॉपी करायचिये? आयुष्यमान खुरानाकडुन टिप्स घ्या

पराग देसाई यांचे वडील रसेश देसाई वाघ-बकरी चहा समूहात व्यवस्थापकीय संचालक आहेत. तर पराग देसाई हे वाघ-बकरी उद्योगात चौथ्या पिढीचे नेतृत्व करत होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी