25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeराजकीयExclusive : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची तातडीने भेट का घेतली?

Exclusive : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची तातडीने भेट का घेतली?

टीम लय भारी

मुंबई : कोकणच्या किनारपट्टीवर धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कोकणातील फळबागांना आणि शेतीला सर्वात मोठा फटका बसला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह रायगड जिल्ह्यात मोठमोठी झाडे कोसळली. अनेक भागात वीजप्रवाह खंडीत झाला आहे जो पूर्ववत व्हायला १५ ते २० दिवस लागणार आहेत. घरांची छपरे आणि कौले उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र आज रायगडचा दौरा करून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच सध्या १०० कोटीची मदत करतो. यापुढे आणखी मदत केली जाईल, अशी घोषणा केली. (Why did Uddhav Thackeray meet Sharad Pawar immediately)

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना ‘फक्त रायगडसाठी तातडीने घोषणा केली पण उर्वरीत कोकणातील जनतेला काय सांगणार, केवळ रायगड म्हणजे कोकण नव्हे. रायगडला १०० कोटी दिले मग रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला काय देणार? नाशिकसह राज्यातल्या अन्य बाधितांना काय देणार? की तुम्हीही मोदींसारखेच प्रत्येक जिल्ह्याला पॅकेज जाहीर करणार’, असा खोचक प्रश्न विचारला आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईला परत येताच तातडीने शरद पवार यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली. वर्षा निवासस्थानी ही बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानबाबत, चक्रीवादळामुळे फटका बसलेल्या लोकांना पुन्हा उभे कसे करायचे? याबाबत चर्चा झाली. सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजना आणि मदतीबद्दल मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे आणि इतर जिल्ह्यातील शेतीचे झालेले नुकसान कसे भरून काढायचे, यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. कोकणातील फळबागांना विशेष मदत देऊन या फळबागा पुन्हा उभ्या करण्याबाबत पवारांनी मुख्यमंत्र्यांना सूचना केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी