31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयराज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील का?

राज्यपाल विशेष अधिवेशन बोलावतील का?

टीम लय भारी

पुणे : राज्यात तयार झालेल्या सत्तापेचामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार मुख्यमंत्री कोण बनणार, हे 11 तारखेनंतरच स्पष्ट होईल. घटनेतील तरतूदीनुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विशेष अधिवेशन बोलावू शकतात. राज्यपालांनी 11 तारखेच्या आत अधिवेशन बोलावणे हे घटना बाह्य आहे, असे मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

विशेष अधिवेशन बोलावून राज्यपालांना फ्लोअर टेस्ट घेता येणार नाही. मुख्यमंत्री पदावर अजूनही उध्दव ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री बदलण्याचा अधिकार आहे. फ्लोअर टेस्टसाठी त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंबरोबर बोलावे लागेल. त्यांनी परवानगी दिली तरच हा निर्णय घेता येईल. राज्यपालांनी दोन वर्षे विधानसभेचे 12 सदस्य न नेमल्यामुळे राज्यपाल विरुध्द मुख्यमंत्री हा सामना जनतेला पहायला मिळाला. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवर या दोघांमध्ये संगनमत होणे शक्य नाही. 174 कलमा खाली सत्र बोलावणे हे मुख्यमंत्रीच्या सल्ल्यावर अवलंबून आहे. त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना न विचारताच सत्र बोलवले तर ते घटना बाह्य ठरु शकते. मुख्यमंत्री या विषयावर कोर्टात दादा मागू शकतात.

शिवाय बंडखोर नेते एकनाथ शिंदे अजून मुंबईत परत आलेले नाहीत. ते उद्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय निश्चित होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा :

ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हकालपट्टी

बंडखोर आमदाराकडून मुंबईतील इमारत दुर्घनाग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर !

‘शिंदे साहेब सेना सोडून जाऊ नका’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी