29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयसदा सरवणकर म्हणाले, मी भाजपला ओळखत नाही

सदा सरवणकर म्हणाले, मी भाजपला ओळखत नाही

टीम लय भारी

मुंबई : मी गुवाहाटीला आलो. त्यामागे भाजपचा हात नाही. भाजपला मी ओळखतही नाही, अशी भावना बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केली आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गुवाहाटीला आलो आहे. माझ्या मतदारसंघातील समस्यांचे निराकरण करण्याचे वचन शिंदे यांनी मला दिले आहे. मला स्वतःला मंत्रीपद नको. माझ्या कुटुंबासाठी काहीही नको. परंतु मतदारसंघातील समस्या सुटल्या पाहीजेत, असे ते म्हणाले.

शिवसेना पक्ष हा हाडामासाच्या शिवसैनिकांमुळे निर्माण झालेला आहे. परंतु या पक्षात अधिकाऱ्यांचे वर्चस्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमावेळी आम्ही गाडी बनविली होती. ही गाडी एका अधिकाऱ्याने तोडून टाकली. या अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

आम्ही वर्षावर जातो तेव्हा हा अधिकारी तिथे असतो. अनेक अधिकारी गोरगरीब लोकांना त्रास देतात. त्यांनी एखादा व्यवसाय सुरू केला तर त्याला महापालिकेचे अधिकारी त्रास देतात. याबाबत मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. सत्ता असूनही लोकांची कामे होत नाहीत, अशी खंत सरवणकर यांनी व्यक्त केली.

हे सुध्दा वाचाः

VIDEO : कट्टर शिवसैनिक संतापला; शहाजी पाटील, तानाजी सावंतांना दिला इशारा !

ठाण्याच्या माजी महापौरांची शिवसेनेतून हकालपट्टी

बंडखोर आमदाराकडून मुंबईतील इमारत दुर्घनाग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी