25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयबिहारमध्ये 3 कोटी मतांची मोजणी शिल्लक,रात्री उशीरा चित्र होणार स्पष्ट

बिहारमध्ये 3 कोटी मतांची मोजणी शिल्लक,रात्री उशीरा चित्र होणार स्पष्ट

टीम लय भारी

पाटणा l बिहारच्या निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहेत. बिहारमध्ये सध्या 1 कोटी मतांचीच मोजणी पूर्ण झाली असून, 3 कोटी मतांची मोजणी बाकी आहे. आतापर्यंत 25 टक्के मतमोजणी झाली. रात्री उशीरा बिहारमधील चित्र स्पष्ट होईल.

बिहारच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांची RJD आणि काँग्रेस यांचे महागठबंधन विरुद्ध नितीश कुमार यांचे JDU आणि भाजप यांची एनडीए अशी लढत होत आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे.

सुरुवातीला तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने मोठी आघाडी घेतली होती. पण दुपारी 2 वाजेपर्यंत भाजपा प्रणीत एनडीए पुढे आहे. दोन्ही आघाड्यांमध्ये बरेच अंतर आहे. भाजपा आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने एकत्र निवडणूक लढवली असली, तरी त्यांच्यातही एक स्पर्धा होती.

दुपारी 2 वाजेपर्यंत 25 टक्के मतमोजणी झाली. सध्याचे जे कल आहेत, त्या बदल होण्याची शक्यता आहे. दोन्ही आघाड्यांकडून जिंकण्याचे दावे केले जात आहे. बिहारमध्ये भाजपाला जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळू शकतात. हाच कल कायम राहिला तर बिहारमध्ये भाजपा मोठा भाऊ बनू शकतो. जेडीयूपेक्षा भाजपाचे उमेदवार जास्त जागांवर आघाडीवर आहेत.

बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण २४३ जागा आहेत. दोन्ही पक्षांनी निम्म्या जागा वाटून घेतल्या. भाजपाने १२१ जागा तर जेडीयूने १२२ जागा लढवल्या. हा कल असाच कायम राहिला तर प्रथमच बिहार एनडीएमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. २०१५ मध्ये भाजपा आणि जेडीयूने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती.

जेडीयूने काँग्रेस आणि राजदसोबत आघाडी करुन ७१ जागांवर विजय मिळवला होता. भाजपाला फक्त ५३ जागा जिंकता आल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत निकाल समोर येतील त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस कायम आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी