28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयजय महाराष्ट्र की होम मिनिस्टर - निलेश राणे

जय महाराष्ट्र की होम मिनिस्टर – निलेश राणे

टीम लय भारी
मुंबई: प्रसाद लाड यांनी सेनाभवनावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजप व सेनेमध्ये शाब्दिक युद्धच पेटले आहे. ते काही शांत होत नाही. आरोप प्रत्यारोप, उत्तर प्रतिउत्तर यांचा खेळ अजूनही चालूच राहिला आहे. (Nilesh rane attacking shivsena)

संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी संजय राऊत यांना ट्विटर वरून प्रतिउत्तर दिलेले आहे.

अंबानींची नजर सबवे वर

Nilesh
प्रसाद लाड यांनी सेनाभवनावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजप व सेनेमध्ये शाब्दिक युद्धच पेटले आहे

“आमचा सीएम जगात भारी”, मुख्यमंत्र्यांवर मनसेचा खोचक पण मजेशीर टोला

मुंबईतील एक उदघाटन समारोहाच्या निमित्ताने आमदार प्रसाद लाड यांनी ‘वेळ पडली तर सेनाभवन फोडू’ अशी चिथावणी सेनेला दिली होती. परंतु काही काळाने त्यांनी आपले वक्तव्य मागे घेतले आहे. तरीही अजून त्यांच्या या वक्तव्याला धरून सेना व भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध सूरु आहे.

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज प्रसाद लाड यांच्यासह इतर विरोधकांवर शाब्दिक हल्ला डागण्यात आला आहे. बाटगे आणि शिखंडीच्या टोळ्यांना हाताशी धरून कोणी मराठी अस्मितेवर दारूच्या गुळण्या टाकत असेल तर मराठी माणूस त्या राजकीय वेबड्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. तरीही तेवढी मर्दानगी असेल तर अंगावर या,’ असं जाहीर आव्हान शिवसेनेनं दिलं आहे. ‘शिवसेना भवनापर्यंत तुम्ही स्वत:च्या पायावर याल, पण जाताना खांद्यावर जायची वेळ येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच, संजय राऊत यांनी मीडियाशी बोलतानाही विरोधकांना खडसावून सोडलं आहे.

रोहित पवारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर साधला निशाणा

Nilesh Rane: ‘थप्पड मारण्याची वल्गना करणारे गर्दी पाहून गाडीत लपले; वाघ म्हणे…’

संजय राऊतांच्या या वक्तव्यावर व अग्रलेखावर निलेश राणे यांनी ट्विटर वरून उत्तर देत प्रश्न विचारले आहेत. शिवसेनेत बाहेरील लोकांचीच संख्या जास्त आहे, हवेतर मोजून बघा, मोबाईल च्या बटनावर चालणारे नेते सेनेत भरलेत असेही राणेंनी म्हटले आहे.

आदेश बांदेकर ‘जय महाराष्ट्र’ म्हणतात की ‘होम मिनिस्टर’ म्हणतात तेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात?,’ असं राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

संपादक धमक्या देताहेत आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करताहेत. संजय राऊत फटके खाणारच आहेत, पण त्यांना सेनाभवनच्या आत नेऊन फटके देणार,’ अशी धमकीच नीलेश राणेंनी दिलीय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी