29 C
Mumbai
Wednesday, August 23, 2023
घरटेक्नॉलॉजीभारताने घडवला इतिहास, चांद्रयान- 3 चे यशस्वी लॅंडींग !

भारताने घडवला इतिहास, चांद्रयान- 3 चे यशस्वी लॅंडींग !

भारतीय अवकाश संशोधन मंडळाच्या चांद्रयान-3 ने यशस्वीरीत्या चंद्रावर लॅंडींग केले आहे. इस्रोच्या या कामगिरीमुळे एक नवा इतिहास घडून संपूर्ण विश्वात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल लॅंडींग करणार भारत पहिलं देश ठरला आहे. सगळ्या भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असून लोक आनंद व्यक्त करीत आहेत. 40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रयानाने आज सफलातपूर्वक चंद्राच्या पृष्ठभागावर लँड केले. या घटनेमुळे इस्रोने अंतराळ संशोधनात दबदबा वाढवण्याचे कार्य केले आहे.

चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग केल्यानंतर चंद्रयानाने एक खास संदेश पाठविला असून ” इंडिया मी माझ्या लक्ष्यापर्यंत पोहोचलो आहे आणि तुम्हीसुद्धा !” इस्रोच्या अधिकृत ट्वीटर हॅंडल वरुन यांची माहिती देण्यात आली.

इस्रोने याआधी केलेल्या चांद्रयान मोहीमा या यशस्वी ठरल्या होत्या. यातील चांद्रयान १ मोहिमतुन चंद्रावर पानी असल्याचा ऐतीहासिक शोध लावण्यात आला होता. तसेच, चांद्रयान २ मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यात येणार होता. यासाठी चंद्राच्या कक्षेत भ्रमण करण्यासाठी ऑरबिटर, विक्रम नामक लँडर आणि प्रज्ञान नामक रोवर् पाठविले गेले होते. परंतु, शेवटच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे सॉफ्ट लॅंडींग करताना लँडर आणि रोवर क्रॅश झाले. तरीही, ऑरबिटर अजूनही चंद्राभोवती भ्रमण करीत काम करत असल्यामुळे चांद्रयान २ मोहिमेतुन काही प्रमाणात यश प्राप्त झाले.

हे ही वाचा 

मंत्री रवींद्र चव्हाण आणि मनसेमध्ये जुंपली

कांद्याने केला सरकारचा वांदा; निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क आकारण्याच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकरी चिडले

एसआरएतील अधिकाऱ्याच्या अनागोंदीमुळे झोपडीधारकांवर रस्त्यावर येण्याची वेळ; शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी

आता चांद्रयान ३ च्या यशस्वी लॅंडींग नंतर भारताच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. अवघ्या ६५० कोटी एवढ्या बजेट मध्ये पुन्हा एकदा मोठी कामगिरी करत इस्रो च्या चांद्रयान ३ मोहिमेचे जगभरातून कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी