29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeएज्युकेशनCET Result : आदित्य ठाकरेंच्या सुचनेमुळे सीईटीचा निकाल उद्या जाहीर होणार

CET Result : आदित्य ठाकरेंच्या सुचनेमुळे सीईटीचा निकाल उद्या जाहीर होणार

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्रातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या सीईटीचा (MAH-MBA/MMS CET 2020) निकाल शनिवारी २३ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा मार्च २०२० मध्ये घेण्यात आली होती. हा निकाल शनिवारी २३ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजल्यानंतर विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतील.

MAH – MBA /MMS CET 2020 ही परीक्षा दिनांक १४ व १५ मार्च २०२० रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला १ लाख १० हजार ६३१ उमेदवार बसले होते. या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक- २३ मे २०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल, असे ट्विट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

याआधी MAH-MBA/MMS CET 2020 परीक्षेचा निकाल लांबल्याने शिवसेनेच्या युवा सेनेचे सचिव वरुन देसाई आणि कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी महाराष्ट्र शासन प्रवेश नियामक प्राधिकरणाचे आयुक्त संदीप कदम यांना निवेदन दिले होते. तसेच युवासेना प्रमुख व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना याप्रकरणी लक्ष देण्याची विनंती केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शासन स्तरावर हालचाल झाली आणि आज दुपारी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत उद्या निकाल लागणार असल्याचे सांगितले आहे.

आधी ३१ मार्च रोजी निकाल जाहीर होणार होता. मात्र राज्याच्या सीईटी कक्षाने हा निकाल लांबणीवर टाकला होता. १४ आणि १५ मार्च २०२० या दोन दिवशी ही परीक्षा घेण्यात आली. ही संगणक आधारित परीक्षा होती.

विद्यार्थी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहू शकतील. cetcell.mahacet.org हे सीईटी कक्षाचे अधिकृत संकेतस्थळ आहे. परीक्षानिहाय स्कोअर आणि एकूण स्कोअर दोन अंकी डेसिमल पॉइंट्समध्ये विद्यार्थ्यांना मिळेल.

राज्यातील सर्व शासकीय व्यवस्थापन संस्था, विद्यापीठातील व्यवस्थापन विभाग, विनाअनुदानित व्यवस्थापन संस्था आदींच्या प्रवेशांसाठी या सीईटीचे गुण ग्राह्य धरण्यात येतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी