29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजआज अटलबिहारी वाजपेयींची 97 वी जयंती, मान्यवरांकडून अभिवादन

आज अटलबिहारी वाजपेयींची 97 वी जयंती, मान्यवरांकडून अभिवादन

टीम लय भारी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. वाजपेयी यांची समाधी ‘सदैव अटल’ येथे पोहोचले. येथे त्यांनी माजी पंतप्रधानांना पुष्प अर्पण केले.( Atal Bihari Vajpayee’s 97th birth anniversary)

पीएम मोदींनी ट्विट करून म्हटले की, आदरणीय अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांच्या देशाच्या भरीव सेवेने आम्ही प्रेरित झालो आहोत. भारताला मजबूत आणि विकसित करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांच्या विकासाच्या उपक्रमांचा लाखो भारतीयांवर सकारात्मक परिणाम झाला आहे.

मोदी सरकार ‘या’ दोन कंपन्यांची मालमत्ता विकणार, 1100 कोटी उभारणार

पंतप्रधान मोदींची नक्कल केल्याबद्दल शिवसेना आमदाराने मागितली माफी

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ‘मी अटलजींना त्यांच्या जयंतीनिमित्त नमन करतो. ते एक महान राष्ट्रवादी होते ज्यांनी एक प्रख्यात वक्ता, एक अद्भुत कवी, एक सक्षम प्रशासक आणि एक उल्लेखनीय सुधारणावादी म्हणून आपला ठसा उमटवला. अटलजींचे अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. अटलजींना विनम्र अभिवादन!’

या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रपती राम नाथ कोविंद, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, निर्मला सीतारामन आणि हरदीप सिंग पुरी यांनीही हजेरी लावली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अटल समाधी स्थळावर त्यांना नेहमीच पुष्पांजली अर्पण केली जाते.

1 जानेवारीला शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार

Atal Bihari Vajpayee’s 97th birth anniversary today: A mass leader, excellent orator, poet and Bharat Ratna awardee, here’s all about former PM

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी