29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजमोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

मोदी सरकारचा चीनवर डिजिटल स्ट्राईक, ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी

नवी दिल्ली केंद्र सरकारने आज (मंगळवार) पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केलं आहे. कारण आता पुन्हा एकदा केंद्र सरकारने ४३ मोबाइल  अ‍ॅप्सवर बंदी  घातली आहे.

सरकारने म्हटले आहे की, ते माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत ४३  मोबाइल अॅप्सवर भारतात प्रतिबंधित करीत आहेत. भारताच्या सार्वभौमत्व, अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानिकारक असलेल्या मोबाइल अ‍ॅप्सविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आज माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ अ अंतर्गत ४३ मोबाइल अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला आहे. या अ‍ॅप्सच्या इनपुटच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी, भारताची सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस धोका असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या अॅप्सवर बंदी घातली गेली आहे.

सरकारच्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र मंत्रालय, गृह मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या विस्तृत अहवालाच्या आधारे भारतातील यूजर्ससाठी या अॅप्सचा प्रवेश रोखण्याचा आदेश जारी केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी