28 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeटॉप न्यूजIPL 2020 : हरभजन सिंगची आयपीएलमधून माघार

IPL 2020 : हरभजन सिंगची आयपीएलमधून माघार

टीम लय भारी

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2020) सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स (CSK) ला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील ऑफ स्पिनर हरभजन सिंगने खासगी कारणास्तव आयपीएलमधून माघार घेतली आहे. यापूर्वीच सीएसकेचा उपकर्णधार सुरेश रैनाही टुर्नामेंट सोडून भारता परतला आहे.

हरभजनने आयपीएलमध्ये 160 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान 829 धावाही केल्या. महेंद्र सिंह धोनी चेन्नईचा कर्णधार आहे. रैना आणि हरभजनसारख्या अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

CSK चे दोन खेळाडू आणि 11 स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह

सीएसके टीमचे 2 खेळाडू दीपक चाहर आणि ऋतुराज गायकवाडसह 11 स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाली होती. 14 दिवसांच्या क्वारंटाइन पीरियडनंतर पुढच्या आठवड्यात सर्वांची परत कोरोना चाचणी होईल. कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना संघात खेळवले जाईल.

आयपीएल 19 सप्टेंबरपासून सुरू होणार

यंदा आयपीएल यूएई (UAE) येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान होणार आहे. सर्व 8 संघामध्ये 60 सामने तीन स्टेडियम दुबई, शारजाह आणि अबु धाबीमध्ये होतील.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी