30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
Homeटॉप न्यूजमहेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

महेंद्रसिंग धोनीच्या कमबॅकविषयी जय शाह यांनी विराट- रोहितशी केली होती चर्चा

टीम लय भारी

मुंबई : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत शाह यांनी धोनीच्या कमबॅकविषयी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माशी चर्चा केली होती. तसेच या निर्णयाला दोघांचीही संमती असल्याचे त्यांनी सांगितले (Jai Shah discusses Mahendra Singh Dhoni’s comeback with Virat-Rohit).

भारताच्या 74 व्या स्वातंत्र्यदिनी धोनीने क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर तो आता पुन्हा भारतीय संघाचा मेन्टॉर म्हणून कामगिरी पाहणार आहे. धोनीने आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत भल्या भल्या गोलंदाजांना गार केले होते. त्याच्या या कामगिरीचा भारतीय संघाला नक्कीच फायदा होणार आहे.

बुमराहला ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मन्थ’ पुरस्कारासाठी नामांकन

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या वेगवान गोलंदाजाचा भारतीय संघात समावेश

टी ट्वेन्टी वर्ल्डकप सामन्यासाठी भारतीय संघात कर्णधार विराट कोहली, उप कर्णधार रोहित शर्मा, के. एल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी यांची निवड करण्यात आली आहे.

Tokyo Paralympics : वयाच्या 18 व्या वर्षी रचला इतिहास, प्रवीण कुमारला उंच उडीत रौप्य पदक

‘MS Dhoni’s appointment is good news but….’ – Sunil Gavaskar reacts as former captain named India’s mentor for T20 World Cup

ऑक्टोबर 17 पासून टी ट्वेन्टी वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे सामने दुबईला शिफ्ट करण्यात आले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी