29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeटॉप न्यूजठाणे ते दिवा ‘या’ मार्गासाठी १८ तासांचा ब्लॉक

ठाणे ते दिवा ‘या’ मार्गासाठी १८ तासांचा ब्लॉक

टीम लय भारी

ठाणे : मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करतानाच लोकलचे वेळापत्रक सुरळीत करण्यासाठी ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामाला मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि मध्य रेल्वेकडून गती दिली जात आहे. मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्त शुक्रवारी या मार्गाच्या कामाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या मंजुरीनंतर या मार्गाच्या कामासाठी येत्या रविवारी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्याचे नियोजन आहे. यामुळे लोकल, मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे(Mega Block : 18 hours block for Thane to Diva). 

गेल्या दहा वर्षांपासून ठाणे ते दिवा पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरूआहे. ही मार्गिका पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा मुदत देण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी, भूसंपादन इत्यादी कारणांमुळे अंतिम मुदत पुढे ढकलण्यात आली. आता मार्गिकेच्या कामाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये मार्गिकेच्या कामासाठी दहा तासांचा मेगाब्लॉक घेतला होता. यामध्ये सध्याचे रूळ थोडे बाजूला घेऊन पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या नवीन रुळांसाठी जागा उपलब्ध करण्यात आली. त्यामुळे ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेसह अन्य तांत्रिक कामेही मोठ्या प्रमाणात करण्यात आली. आता रविवार, १९ डिसेंबरला १८ तासांच्या मोठ्या मेगाब्लॉकचे एमआरव्हीसी आणि मध्य रेल्वेने नियोजन केले  आहे.

कोरोनानंतर मेट्रोच्या सर्वाधिक प्रवासी संख्येची नोंद

नवी मुंबईकर कमी दरामध्ये करू शकणार मेट्रोने ‘गारेगार’ प्रवास, जाणून घ्या तिकिट दर…

यामध्ये रुळांची जोडणी करण्यासह काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. हा ब्लॉक सकाळी ८ ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. त्याआधी शुक्रवारी मध्य रेल्वे मुख्य सुरक्षा आयुक्तांच्या पाहणी आणि मंजुरीनंतर ब्लॉक घेतला जाईल. ब्लॉकमुळे कमी लोकल फेऱ्या धावतील. तर मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या मार्गिकेचे काम जानेवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मुख्य सुरक्षा आयुक्त शुक्रवारी ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी दिली. पाहणी केल्यावर त्यांच्या मंजुरीनंतर १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

Mumbai: Mega block on Thane-Diva stretch likely to take place this week amid finals works of two additional rail lines

ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यात येत असून त्यासाठी १८ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रवी अग्रवाल यांनी दिली. याआधी मुख्य सुरक्षा आयुक्त पाहणीही करणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी